Ind vs Sa T20 WC Final Live Score : चोकर्स तर दक्षिण आफ्रिकाच! हार्दिक अन् सूर्यानं हरलेली मॅच दिली जिंकून

India vs South Africa T20 WC 2024 Final Match Live Scorecard Updates : 2024 च्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली.
Team India | T20 World Cup 2024
Team India | T20 World Cup 2024Sakal
Updated on

Ind vs Sa T20 WC Final Live Score : चोकर्स तर दक्षिण आफ्रिकाच! हार्दिक अन् सूर्यानं हरलेली मॅच दिली जिंकून

अखेरीस बुमराह आणि आर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला मोठ्या धावा करण्याची संधी दिली नाही. हार्दिक पांड्याच्या अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमारने डेव्हिड मिलरचा बाऊंड्री लाईन जवळ अफलातून झेल घेतला.

हा सामन्यातील टर्निंग पाँइंट ठरला. यानंतर मात्र दक्षिण आफ्रिका सामन्यात मागे पडले आणि त्यांना पराभवाचा धक्का बसला. मिलर 17 चेंडूत 21 धावा करून बाद झाला.

भारताने ठेवलेल्या 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 8 बाद 169 धावाच करता आल्या. त्यामुळ भारताने 7 धावांनी विजय मिळवला.

Ind vs Sa T20 WC Final Live Score : बुमराहने मार्को यान्सिनला धाडलं माघारी

जसप्रीत बुमराहने मार्को यान्सिनला 18 व्या षटकात बाद केले. त्याने 2 धावा केल्या.

Ind vs Sa T20 WC Final Live Score : हार्दिकने उंचावल्या भारतीयांच्या आशा, अर्धशतक करणारा हेन्रिक क्लासेन आऊट

अर्धशतक केल्यानंतर क्लासेनला हार्दिक पांड्याने 17 व्या षटकात बाद केले. क्लासेनने 27 चेंडूत 52 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 5 षटकार मारले.

Ind vs Sa T20 WC Final Live Score : दक्षिण आफ्रिका विजयाच्या जवळ, क्लासेनचे आक्रमक अर्धशतक

दक्षिण आफ्रिकेचा डाव हेन्री क्लासेन आणि डेव्हिड मिलरने आक्रमक खेळत सावरला. यावेळी क्लासेनने आक्रमक अर्धशतकही केलं.

Ind vs Sa T20 WC Final Live Score : दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का! खेळपट्टीवर स्थिरावलेला क्विंटन डी कॉक आऊट

दक्षिण आफ्रिकेला क्विंटन डी कॉक आणि डेव्हिड मिलर यांनी मिळून सहज 100 धावांचा टप्पा पार करून दिला होता. अखेर डी कॉकला 39 धावांवर आर्शदीप सिंगने बाद केले.

Ind vs Sa T20 WC Final Live Score : अक्षर पटेल पुन्हा ठरला संकटमोचक, आक्रमक खेळणाऱ्या स्टब्सला धाडलं माघारी

सुरुवातीच्या विकेट्स लवकर पडल्यानंतर ट्रिस्टन स्टब्सने क्लिंटन डी कॉकबरोबर डाव सावरला. त्याने आक्रमक खेळ केला. मात्र त्याला ९ व्या षटकात अक्षर पटेलने त्रिफळाचीत केले. त्याने २१ चेंडूत ३१ धावांची खेळी केली.

Ind vs Sa T20 WC Final Live Score : हेंड्रिक्सपाठोपाठ द. आफ्रिकेचा कर्णधारही बाद

तिसऱ्या क्रमांकावर उतरलेला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमही लवकर बाद झाला. त्याला तिसऱ्या षटकात ४ धावांवर आर्शदीप सिंगने बाद केले. त्याचा झेल ऋषभ पंतने घेतला.

Ind vs Sa T20 WC Final Live Score : भारताची दणक्यात सुरुवात! बुमराहने द. आफ्रिकेला दिला पहिला धक्का

दक्षिण आफ्रिकेकडून 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीला रिझा हेंड्रिक्स आणि क्विंटन डी कॉक उतरले. मात्र दुसऱ्याच षटकात रिझा हेड्रिक्सला 4 धावांवर जसप्रीत बुमराहने त्रिफळाचीत केले.

Ind vs Sa T20 WC Final Live Score : विराट कोहलीची चॅम्पियन इनिंग, दुबेचीही हाणामारी; भारताने ठेवले 177 धावांचे आव्हान

विराट कोहलीने 59 चेंडूत 76 धावा करत भारताला 170 धावांच्या पार पोहचवले. शिवम दुबेनेही 16 चेंडूत 27 धावा करत चांगला हातभार लावला. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 177 धावांचे आव्हान ठेवले आहे.

विराट कोहलीची संथ फलंदाजी, शिवमची फटकेबाजी 

विराट कोहलीची धावगती मंदावली असून त्यानं 48 चेंडूत 50 धावा केल्या. दुसरीकडे शिवम दुबेने 12 चेंडूत 21 धावा केल्या आहेत. भारताच्या 17 षटकात 4 बाद 134 धावा झाल्या आहेत.

Ind vs Sa T20 WC Final Live Score : अक्षरचा आत्मघात; धावबाद झाल्यानं हुकलं झुंजार अर्धशतक

अक्षर पटेल 47 धावा करून धावबाद झाला. त्यानं 31 चेंडूत 47 धावांची खेळी केली. त्याने विराट कोहलीसोबत 54 चेंडूत 72 धावांची भागीदारी रचली.

Ind vs Sa T20 WC Final Live Score : टीम इंडियाच्या मदताला 'बापू' आला धावून; टीम इंडियानं शतक केलं पार

टीम इंडियाचा बापू, अक्षर पटेलने दमदार फलंदाजी करत भारताला 13 व्या षटकात 98 धावांपर्यत पोहवचलं. त्यानं विराट कोहली सोबत 51 चेंडूत 64 धावांची भागीदारी रचली.

विराट - अक्षरची अर्धशतकी भागीदारी 

विराट कोहली आणि अक्षर पटेलने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला 90 धावांच्या पार पोहचवलं.

Ind vs Sa T20 WC Final Live Score : विराट अन् अक्षरनं सावरला डाव; भारताने पार केल्या 75 धावा

भारताने तीन झटक्यानंतर डाव सावरला. विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी भागीदारी रचत संघाला 10 षटकात 3 बाद 75 धावांपर्यंत पोहचवलं.

Ind vs Sa T20 WC Final Live Score : भारत अडचणीत, पॉवर प्लेमध्ये भारताला तीन धक्के

भारताने पॉवर प्लेमध्ये 6 षटकात 3 बाद 45 धावा केल्या आहेत.

Ind vs Sa T20 WC Final Live Score : भारत अडचणीत, सूर्या देखील झाला बाद

कगिसो रबाडाने सूर्यकुमार यादवला 3 धावांवर बाद करत भारताला तिसरा धक्का दिला. भारताच्या 5 षटकात 3 बाद 39 धावा झाल्या आहेत.

Ind vs Sa T20 WC Final Live Score : विराट कोहलीने दोन चौकारांनी केली सुरूवात; मात्र केशव महाराजने दिले दोन धक्के

विराट कोहलीने सलग दोन चौकार मारत आपल्या इनिंगची सुरूवात केली. मात्र पुढच्याच षटकात रोहित शर्मा दोन चौकार मारून केशव महाराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. पाठोपाठ पंत देखील खाते न उघडता माघारी गेला. भारताच्या 2 षटकात 2 बाद 23 धावा झाल्या.

Ind vs Sa T20 WC Final Live Score : बार्बाडोसमध्ये सूर्यदेवाचं 'प्रखर' दर्शन; रोहितने नाणेफेक जिंकली अन् सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला

बार्बाडोसमध्ये सूर्यदेवानं दर्शन दिलं आहे. नाणेफेक वेळावर झाली असून भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली. रोहितने अपेक्षेप्रमाणे प्रथम फलंदाजी घेतली आहे. रोहितने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.

Ind vs Sa T20 WC Final Live Score : भारत-आफ्रिका संघ अंतिम सामन्यासाठी पोहोचला स्टेडियममध्ये, थोड्याच वेळात होणार टॉस

भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ अंतिम सामन्यासाठी स्टेडियमवर पोहोचले आहेत. बार्बाडोसमधील हवामान स्वच्छ दिसत आहे. ही चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे. अशा स्थितीत नाणेफेक वेळेवर होणे अपेक्षित आहे.

IND vs SA Final Barbados Weather Live Updates :  बार्बाडोसमधून दिनेश कार्तिकने दिली मोठी अपडेट! 'तो' पहिला व्हिडिओ आला समोर; कसे आहे वातावरण? 

ताज्या माहितीनुसार, हवामान थोडे स्वच्छ असले तरी ढगाळ वातावरण आहे. हलका सूर्यप्रकाशही येत आहे, पण वारेही जोरात वाहत आहेत. हा सामना बार्बाडोसमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 पासून खेळला जाईल.

क्रिकेटर आणि समालोचक दिनेश कार्तिकनेही बार्बाडोसची ताजी परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कार्तिकने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये हवामान अगदी स्वच्छ दिसत आहे. कार्तिकच्या म्हणण्यानुसार हवामान स्वच्छ असल्याने सामना वेळेवर सुरू होण्याची शक्यता आहे.

बार्बाडोसमध्ये शुक्रवारी पाऊस झाला होता. ज्यामुळे चाहत्यांचे टेन्शन वाढले. मात्र, सामन्यादरम्यान पावसाची 60 टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. तसेच, शनिवारी देखील सामना पूर्ण करण्यासाठी 190 मिनिटे अतिरिक्त उपलब्ध असतील.

IND vs SA Final Barbados Weather Live Updates : अंतिम सामन्याची प्रतीक्षा वाढणार? बार्बाडोसमध्ये पुन्हा झाली पावसाला सुरुवात

काही तासाआधी आनंदाची बातमी समोर आली होती की गेल्या 8 तासांपासून पाऊस थांबला होता आणि सकाळपासून वातावरण स्वच्छ होते, मात्र पुन्हा एकदा हलका पाऊस सुरू झाला आहे.

IND vs SA Final Barbados Weather Live Updates : बार्बाडोसमधून मोठी बातमी! पाऊस थांबला, इतके तास झालं पडला नाही थेंब, समोर आले फोटो

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बार्बाडोसमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर आता गेल्या 8 तासांपासून पाऊस बंद आहे आणि सकाळी तरी वातावरण स्वच्छ दिसत आहे.

IND vs SA Final Barbados Weather Live Updates : मोठी बातमी! बार्बाडोसमध्ये मुसळधार पावसाचा तांडव; व्हिडिओ आला समोर

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना बार्बाडोस येथे भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. मात्र, अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

फायनलपूर्वी बार्बाडोसमध्ये पाऊस

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की अंतिम सामन्याच्या आदल्या रात्री बार्बाडोसमध्ये जोरदार पाऊस झाला. हे व्हिडिओ पाहून चाहत्यांचे टेन्शनही वाढू लागले आहे. असं असलं तरी, सामन्यादरम्यान पावसाची 78 टक्के शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. अंतिम सामन्यासाठी आयसीसीने नवीन नियमही लागू केले आहेत. या सामन्यासाठी 190 अतिरिक्त मिनिटे ठेवण्यात आली आहेत.

आयसीसीने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. पावसामुळे सामना पूर्ण झाला नाही तर उद्या म्हणजेच 30 जून रोजी सामना पूर्ण होईल. याशिवाय राखीव दिवशीही सामना पूर्ण झाला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेता घोषित केले जाईल.

India vs south africa T20 World cup 2024 Final Live Score Updates :

भारताने टी 20 वर्ल्डकप 2024 च्या अंतिम सामन्यात 20 षटकात 7 बाद 176 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने संथ अर्धशतकानंतर आक्रमक फलंदाजी करत 59 चेंडूत 76 धावा केल्या. तर अक्षर पटेलने 31 चेंडूत 47 धावा केल्या. त्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये शिवम दुबेने 17 चेंडूत 27 धावा करत भारताला 170 धावांच्या पार पोहचवलं.

दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने पॉवर प्लेमध्ये भारताला पाठोपाठ दोन धक्के देत मोठे टेन्शन दिलं होतं. नॉर्खियाने देखील 2 विकेट्स काढत भारताला धक्के दिले. रबाडाने सूर्याची एकमेव विकेट घेत आपला हातभार लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.