Video: स्वागत नहीं करोगे हमारा! वर्ल्ड कप विजेत्या Hardik Pandya साठी उसळली तौबा गर्दी

Hardik Pandya Welcome: टी२० वर्ल्ड कप विजयानंतर हार्दिक पांड्या पहिल्यांदाच आपल्या गावी गेला, त्यावेळी त्याच्या स्वागत सोहळ्यात लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
Hardik Pandya
Hardik PandyaSakal
Updated on

Hardik Pandya Video: भारतीय क्रिकेट संघाने २९ जून रोजी टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केले. भारताचे हे दुसरे टी२० वर्ल्ड कप विजेतेपद आहे, तर तब्बल ११ वर्षांनी भारताने आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरले.

भारताच्या या यशात हार्दिक पांड्याचेही महत्त्वाचे योगदान राहिले. हार्दिकने या स्पर्धेत ८ सामन्यांत १४४ धावा केल्या, तर ११ विकेट्स घेतल्या. त्याने अंतिम सामन्यातही तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांच्या विकेट्सचा समावेश आहे.

ही स्पर्धा जिंकल्यानंतर पहिल्यांदाच हार्दिक सोमवारी (१५ जुलै) आपल्या मुळगावी बडोद्याला गेला होता. त्यावेळी त्याचे तेथील लोकांनी जोरदार स्वागत केले. त्याच्यासह त्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्या देखील होता. त्याच्या या स्वागत सोहळ्यात हजारो लोकांची गर्दी रस्त्यावर झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी हार्दिकही लोकांना अभिवादन करताना दिसला.

दरम्यान, भारतीय संघ या टी२० वर्ल्ड कप विजयानंतर ४ जुलै रोजी वेस्ट इंडीजमधून मायदेशी परतला होता. भारतात परतल्यानंतर सकाळी दिल्लीमध्ये भारतीय संघाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर त्याचदिवशी संध्याकाळी भारतीय संघ मुंबईत आला.

मुंबईत भारतीय संघाची मरिन ड्राईव्हवर ओपन बसमध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला होता.

Hardik Pandya
Hardik Pandya Video : अनंत अंबानींच्या लग्नात हार्दिक पांड्याचं विमान ढगात? वेटर सोबत बोलतानाचा 'तो' Unseen व्हिडीओ व्हायरल

हार्दिकने रचला इतिहास

या टी२० वर्ल्ड कपनंतर आयसीसीने जागतिक क्रमवारी जाहीर केली होती. या क्रमवारीत हार्दिक पांड्याने गरुड झेप घेतली होती. हार्दिक टी२० क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर आला आहे.

तो पुरुषांच्या टी२० क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांक पटकावणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. हार्दिक सध्या या क्रमवारीत श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगासह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे.

Chitra smaran:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.