Video : पाकिस्तानला लागली मिर्ची; टीम इंडिया सेमीफायनलमध्ये जाताच लावला 'बॉल टॅम्परिंग'चा गंभीर आरोप

Saleem Malik and Inzmam ul Haq accused Team India of ball Tempering : पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने टीम इंडियावर 'बॉल टॅम्परिंग'चा गंभीर आरोप केला आहे.
Inzmam ul Haq accused Team India of ball Tempering
Inzmam ul Haq accused Team India of ball Temperingsakal

Team India T20 World Cup 2024 : भारतीय क्रिकेट संघाने 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. 24 जून रोजी एका रोमहर्षक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.

वर्ल्ड कपमधील भारताची चमकदार कामगिरी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंना आवडलेली नाही. यामुळेच पाकिस्तानी टीव्हीवर बसून त्यांच्या माजी क्रिकेटपटू टीम इंडियावर गंभीर आरोप लावले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधाराने भारतीय संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला होता.

Inzmam ul Haq accused Team India of ball Tempering
ICCची मोठी घोषणा! टीम इंडियाची 'पनौती' अंपायरपासून सुटका; IND vs ENG सेमीफायनलमध्ये कोण असणार पंच?

पाकिस्तान क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक आणि संघाचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने भारतीय संघावर खळबळजनक आरोप केला आहे. इंझमामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी करताना भारतीय संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला होता. पाकिस्तानच्या स्पोर्ट्स 24 वृत्तवाहिनीवर इंझमामने टीम इंडियावर हा आरोप केला आहे.

तो म्हणाला की, 'अर्शदीप सिंगला डावाच्या 15व्या षटकात स्विंग मिळत होता. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होते. याचा अर्थ 12व्या आणि 13व्या षटकापर्यंत चेंडू स्विंगसाठी तयार होता. भारताने चेंडूशी छेडछाड केली की नाही हे पंचांनी तपासावे.

इंझमामच्या या आरोपाला आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटर सलीम मलिक यानेही पाठिंबा दिला आहे. या प्रकरणाची चौकशी होणार नसल्याचे सलीम यांनी सांगितले. भारतीय संघासह काही संघांनाचौकशीतून सूट देण्यात आली आहे. येथे पाकिस्तान टीम असती तर चौकशी झाली असती.

Inzmam ul Haq accused Team India of ball Tempering
Ind vs Eng: मोठी अपडेट! सेमीफायनल न खेळता टीम इंडिया खेळणार थेट फायनल; जाणून घ्या समीकरण

पाकिस्तानच्या खेळाडूंना वर्ल्ड कपमधील भारताची कामगिरी पचवता येत नाही आणि उलटसुलट विधाने करत राहतात. एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये मोहम्मद शमीने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने विरोधी फलंदाजांना अडचणीत आणले होते. त्याच्या गोलंदाजीचे सर्वत्र कौतुक होत होते, पण पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रझा यांनी शमीवर त्यावेळी आरोप केला होता. हसन इतका मोठा क्रिकेटपटू नव्हता, त्यामुळे त्याच्या वक्तव्याचे जास्त चर्चा झाली नाही पण इंझमाम उल हकसारख्या मोठ्या क्रिकेटपटूकडून अशा विधानाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com