IND vs NZ, T20 World Cup 2021: भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत सलग दोन सामने गमावले. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होता. त्यात भारत १० गड्यांनी पराभूत झाला. पाठोपाठ न्यूझीलंडने भारताला ८ गडी राखून पराभूत केले. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंवर प्रचंड टीका झाली. भारतासारखा बलाढ्य संघ वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत अतिशय सुमार कामगिरी करत असल्याने चाहतेही संतापले. याचदरम्यान, भारताच्या खराब कामगिरीचं कारण काय, याचं उत्तर जसप्रीत बुमराहने दिलं.
"क्रिकेटसारख्या मैदानी खेळात चांगली कामगिरी करायची असेल, तर योग्य ती विश्रांती मिळायला हवी. IPL आणि टी२० वर्ल्ड कप यांच्या दरम्यान आम्हाला अपेक्षित विश्रांती मिळाली नाही. सध्याचा काळ खूपच कठीण आहे. कोरोनाने साऱ्या जगाला घाबरवून ठेवलं आहे. अशा वेळी बायो बबलमध्ये राहण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही परिस्थितीशी कितीही जुळवून घेण्याचा प्रयत्न केलात तरीही त्या बबलची भीती निर्माण होते आणि त्याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर होतो", असं बुमराहने सांगितलं.
भारतीय संघ २०२०च्या शेवटी ऑस्ट्रेलियात होता. त्यानंतर इंग्लंडचा संघ भारतात क्रिकेट मालिकेसाठी आला. त्यानंतर IPL चा हंगाम आला. तो अर्ध्यावर सोडल्यानंतर भारत वि न्यूझीलंड विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी झाली. त्यात पराभूत झालेला संघ लगेचच इंग्लंडमध्ये कसोटा मालिका खेळला. तेथून दुबईला IPLची उर्वरित स्पर्धा खेळण्यासाठी सर्व खेळाडू आले. आणि आता केवळ ३-४ दिवसांच्या अंतराने भारतीय संघ टी२० विश्वचषक स्पर्धेत उतरला. या सर्व क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघ बायो बबलमध्ये होता. त्यामुळे याचा परिणाम त्यांच्यावर झाला. त्याबद्दलही बुमराह म्हणाला, "जेव्हा तुम्ही एकामागोमाग तीच तीच गोष्ट करत राहता तेव्हा विश्रांती गरज भासते. नाही तर त्या गोष्टीत सातत्य न येता 'तोच-तोच'पणा येतो. नवीन काही करण्याची इच्छा असली तरी मानसिक स्वास्थ्यामुळे ते करणं अवघड जातं. आणि गोष्टी हळूहळू तुमच्या नियंत्रणाबाहेर जातात."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.