Jasprit Bumrah Ind vs Pak : 24 चेंडू… 15 डॉट्स… 3 विकेट… बूम बूम बुमराहने फिरवले टेबल अन् भारताने केला मोठा विक्रम

Jasprit Bumrah India vs Pakistan T20 World Cup 2024 : या सामन्यात बूम बूमने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यावरून 120 धावांचे माफक लक्ष्य असतानाही पाकिस्तानी फलंदाज गुडघे टेकताना दिसत होते.
Jasprit Bumrah Ind vs Pak : 24 चेंडू… 15 डॉट्स… 3 विकेट… बूम बूम बुमराहने फिरवले टेबल अन् भारताने केला मोठा विक्रम
Updated on

IND vs PAK T20 World Cup 2024 : न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ सामना जिंकला त्याचा हिरो होता जसप्रीत बुमराह. या सामन्यात बूम बूमने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यावरून 120 धावांचे माफक लक्ष्य असतानाही पाकिस्तानी फलंदाज गुडघे टेकताना दिसत होते.

Jasprit Bumrah Ind vs Pak : 24 चेंडू… 15 डॉट्स… 3 विकेट… बूम बूम बुमराहने फिरवले टेबल अन् भारताने केला मोठा विक्रम
Ind Vs Pak T20 WC24 : बुमराह ठरला पाकिस्तानचा कर्दनकाळ! भारतानं 119 धावा डिफेंड करत पाकिस्तानचं केलं जवळपास पॅक अप

यामुळेच त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारही देण्यात आला. जसप्रीत बुमराहने 4 षटकातील 24 चेंडूत केवळ 14 धावा दिल्या आणि तीन विकेट्सही घेतल्या. विशेष म्हणजे बूम बूमच्या 24 पैकी 15 चेंडू डॉट होते. त्याच्यासमोर पाकच्या फलंदाजांना एकही चौकार-षटकार मारता आला नाही. या विजयासह भारतीय संघाने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धचा हा 8 पैकी सातवा विजय आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने सर्वात लहान लक्ष्याचा बचाव करण्याचा विक्रम केला आहे.

Jasprit Bumrah Ind vs Pak : 24 चेंडू… 15 डॉट्स… 3 विकेट… बूम बूम बुमराहने फिरवले टेबल अन् भारताने केला मोठा विक्रम
Jasprit Bumrah : रिझवानची दांडी अन् भारतानं भाकरी फिरवली; टीम इंडियाच्या विजयाची ही आहेत 5 कारणं

एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक विजय

आज टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रमही भारताने केला आहे. भारतीय संघाने एकूण आठ वेळा पाकिस्तानचा सामना केला आणि सात वेळा विजय मिळवला. या व्यासपीठावर पाकिस्तानने भारताला एकदाच पराभूत केले आहे. या यादीत पाकिस्तान संघ दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशला सहा वेळा पराभूत केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com