Jasprit Bumrah Statement On Retirement : वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाच्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर खेळाडूंना मंचावर बोलावून सन्मानित करण्यात आले. दरम्यान टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टूर्नामेंटचा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ठरलेल्या जसप्रीत बुमराहने निवृत्तीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
निवृत्तीवर बुमराह काय म्हणाला?
टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या तीन दिग्गज खेळाडूंनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ज्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. त्यानंतर आता बुमराहही निवृत्तीबद्दल स्पष्ट बोलला आहे. बुमराह म्हणाला की, सध्या टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा त्याचा कोणताही विचार नाही, ही फक्त त्याची सुरुवात आहे. त्यांना अजून पुढे जायचे आहे.
फायनल जिंकल्यानंतर रडला बुमराह
जसप्रीत बुमराह म्हणतो की मी सहसा कधी रडत नाही पण हा विजय अविश्वसनीय होता. माझ्या मुलाला पाहिल्यानंतर माझ्या मनात ज्या भावना उमटल्या त्या खूपच आश्चर्यकारक होत्या. यानंतर मला माझे अश्रू आवरता आले नाहीत.
टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी केली. टीम इंडियाला जेव्हा जेव्हा विकेटची गरज भासली तेव्हा बुमराहने टीमला विकेट मिळवून दिली. या स्पर्धेत बुमराहने 4.17 च्या इकॉनॉमीसह 15 विकेट घेतल्या. भारताला चॅम्पियन बनवण्यात जसप्रीत बुमराहचा मोठा वाटा आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे बुमराहला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही निवडण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.