India vs Scotland, T20 World Cup: भारतीय संघाने तुलनेने कमकुवत समजल्या जाणाऱ्या स्कॉटलंड संघाचा अवघ्या ८५ धावांत धुव्वा उडवला. भारताचा कर्णधार विराट कोहली याने अखेर आज नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी विराटचा निर्णय सार्थ ठरवला. भारताकडून रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी दोघांनी ३-३ बळी घेतले. तर जसप्रीत बुमराहने २ आणि रविचंद्रन अश्विनने १ गडी बाद केला. या डावात बुमराहने एक धडाकेबाज विक्रम आपल्या नावे केला.
भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आजच्या सामन्यात ३.४ षटके टाकली. या षटकांमध्ये त्याने केवळ १० धावा दिल्या आणि दोन बळी मिळवले. कायल कोएत्झर आणि मार्क वॅट या दोघांनाही त्याने त्रिफळा उडवून बाद केले. त्यासोबतच जसप्रीत बुमराहचे टी२० क्रिकेटमध्ये ६४ बळी झाले आणि तो भारताकडून टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल (६३ बळी) याला मागे टाकले.
दरम्यान, स्कॉटलंडच्या फलंदाजांनी फारच वाईट फलंदाजी केली. सलामीवीर जॉर्ज मुन्सीने सर्वाधिक २४ धावांची खेळी केली. मायकल लीस्कनेही २१ धावांची भर घातली. पण इतर कोणताही फलंदाजी २० वैयक्तिक धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. ७ फलंदाज तर दोन आकडी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. जाडेजा आणि शमी दोघांनीही प्रत्येकी १५ धावांत ३ बळी टिपले. बुमराहने १० धावांत २ तर अश्विनने २९ धावांत १ बळी मिळवला. वरूण चक्रवर्तीने ३ षटकात १५ धावा दिल्या पण त्याला एकही गडी बाद करता आला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.