'आता त्यांनी फक्त...', रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या भवितव्याबाबत जय शहा स्पष्टच बोलले

दक्षिण आफ्रिकेला हरवून ट्वेन्टी-२० विश्वकरंडक जिंकताच विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यापाठोपाठ रवींद्र जडेजा यांनी ट्वेन्टी-२० प्रकारातून निवृत्ती स्वीकारली. त्यामुळे एकदिवसीय प्रकारातही ते खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
Jay Shah on Champion trophy virat kohli rohit sharma
Jay Shah on Champion trophy virat kohli rohit sharmasakal

Jay Shah on Champion trophy : पुढील वर्षी होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी (एकदिवसीय स्पर्धा) आणि कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारतीय संघ पात्र ठरला तर सिनियर खेळाडू संघात असतील, असे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी सांगितले. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा पुढील वर्षापर्यंत तरी एकदिवसीय क्रिकेट खेळणार हे निश्चित झाले आहे.

दक्षिण आफ्रिकेला हरवून ट्वेन्टी-२० विश्वकरंडक जिंकताच विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यापाठोपाठ रवींद्र जडेजा यांनी ट्वेन्टी-२० प्रकारातून निवृत्ती स्वीकारली. त्यामुळे एकदिवसीय प्रकारातही ते खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, मात्र जय शहा यांनी सोमवारी बीसीसीआयचे धोरण स्पष्ट केले. ट्वेन्टी-२० प्रकारात हार्दिक पंड्या रोहितचा कर्णधार म्हणून उत्तराधिकारी असेल की नाही याबाबत निवड समिती निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Jay Shah on Champion trophy virat kohli rohit sharma
T20 World Cup Final: ऋषभ पंतच्या चतुराईचा झाला फायदा अन् क्लासेनची गेली विकेट, गावसकरांनी सांगितलं कोणता क्षण ठरला महत्त्वाचा

सोमवारी सकाळी मीडियाशी बोलताना जय शहा यांनी या ट्वेन्टी-२० प्रकारात सिनियर्स खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. कर्णधार म्हणून रोहित शर्मा, अंतिम सामन्यात विराट कोहलीने केलेली निर्णायक फलंदाजी आणि रवींद्र जडेजाचे अष्टपैलूत्व याचा उल्लेख केला. हे तीन सिनियर खेळाडू निवृत्त झाल्यामुळे भारतीय संघातील संक्रमणाची प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही ते म्हणाले.

याप्रकारे आता आपला हा भारतीय संघ प्रगती करत आहे ते पाहता आपले लक्ष्य आता कसोटी अजिंक्यपद आणि चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. त्यासाठी हे सिनियर खेळाडू संघात असतील, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. याचा अर्थ फेब्रुवारी-मार्चमध्ये अपेक्षित असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंतच्या एकदिवसीय सामन्यात रोहित, विराट आणि जडेजा खेळण्याची शक्यता आहे.

Jay Shah on Champion trophy virat kohli rohit sharma
Team India Captain: रोहित शर्मानंतर हार्दिक पांड्या नाही, तर 'या' खेळाडूने करावे टीम इंडियाचे नेतृत्व, सेहवागने सांगितलं नाव

अशा आहेत मालिका

विश्वकरंडक स्पर्धेनंतर आता नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला संघ झिम्बाब्वेमध्ये केवळ टी-२० मालिका खेळायला जाणार आहे. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यात एकदिवसीय मालिकेनंतर मायदेशात न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामने होणार आहेत.

टी-२० प्रकारात हार्दिक पंड्याकडे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता आधिक आहे; पण त्याच्यासह शुभमन गिलही शर्यतीत असेल. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी हार्दिकला विश्रांती देण्यात आली असून गिल नेतृत्व करणार आहे. हार्दिकसमोर तंदुरुस्तीचा मूळ प्रश्न असू शकेल.

भारतीय संघ बार्बाडोसमध्ये अडकला

ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना झालेल्या बार्बाडोसला मोठे वादळ धडकत आहे. परिणामी, विमानतळही बंद करण्यात आल्यामुळे भारतीय संघ बार्बाडोसमध्येच अडकला आहे. जय शहाही तेथेच आहेत. मायदेशी परतल्यानंतर संघाच्या सत्कार सोहळ्याची आखणी करू, असे त्यांनी सांगितले.

Shabda kode:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com