Jonathan Trott : मला कोणत्याही अडचणीत सापडायचं नाही मात्र... सेमी फायनलनंतर अफगाणिस्तानचा कोच हे काय म्हणाला?

T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानचा कोच जोनाथन ट्रॉटने सेमी फायनल हरल्यावर पत्रकारांशी संवाद साधला.
Jonathan Trott
Jonathan Trott AFG vs RSAesakal
Updated on

Jonathan Trott AFG vs RSA : अफगाणिस्तानचा टी 20 वर्ल्डकप 2024 मधील ऐतिहासिक प्रवास सेमी फायनलमध्ये संपुष्टात आला. राशिद खानच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेने 9 विकेट्स राखून पराभव केला अन् पहिल्यांदाच वर्ल्डकपची फायनल गाठली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानला फक्त 56 धावाच करता आल्या. ही टी 20 वर्ल्डकप आणि आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यातील इतिहासातील सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. अफगाणिस्तानचा प्रवास सेमी फायनलमध्येच संपुष्टात आल्यानंतर अफगाणिस्तानचा कोच जोनाथन ट्रॉटने आयसीसीवर टीका केली. तो म्हणाला की हा काही समान संधी देणारा सामना नव्हता.

Jonathan Trott
IND vs ENG : रोहित शर्मा विरूद्ध जॉस बटलर! सामन्यापूर्वीच 6 योगायोग; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

पत्रकार परिषदेत बोलताना जोनाथन ट्रॉट म्हणाला की, 'मी स्वतःला कोणत्याही अडचणीत टाकू इच्छित नाही. तसंच कोणतंही कारण देऊ इच्छित नाही. मात्र वर्ल्डकपच्या सेमी फायनल सारख्या सामन्यात अशा प्रकारची खेळपट्टी असू नये. साधी आणि सरळ जेणेकरून सामन्यात समान संधी मिळेल.'

माझं म्हणणं असंही नाहीये की खेळपट्टी पूर्णपणे पाटा असावी. चेंडू स्पिन आणि सीम होऊ नये. मात्र फलंदाजांना चेंडू डोक्यावरून जातो का याची सतत भीती वाटत नसावी. फलंदाजाला चेंडू खेळताना तुम्ही तो लाईनमध्ये येऊन खेळता किंवा कौशल्याने खेळता येईल इतका विश्वास खेळपट्टीबाबत निर्माण झाला पाहिजे.

आक्रमक फलंदाजी करणे, धावा करणे आणि विकेट्स घेणे ही टी20 क्रिकेटची वैशिष्टे आहेत. इथं तुम्ही बचावात्मक खेळणे हा टी20 क्रिकेटचा गुणधर्म असू नये.'

Jonathan Trott
IND vs ENG T20 WC 24 : बापूने इंग्लंडला आणलं गुडघ्यावर, कुलदीपचाही जलवा; 10 वर्षांनी भारतानं गाठली फायनल

ट्रॉटच्या मते खेळपट्टीकडून दोन्ही संघांना मदत मिळायला हवी. मात्र या खेळपट्टीने दक्षिण आफ्रिकेला जास्त मदत केली आहे.

तो म्हणाला की, 'जर विरोधी संघाने आपल्या कौशल्याने जर प्रतिस्पर्धी संघाला अशा परिस्थितीत टाकलं तर ते ठिक आहे. अशा वेळी तुम्हाला खेळपट्टीशी जुळवून घेता आलं नाही असं म्हणता येईल.'

'जर आम्ही दक्षिण आफ्रिकेसारखी गोलंदाजी करू शकलो असतो तर तुम्हाला दुसऱ्या हाफमध्ये वेगळी स्थिती पाहावयास मिळाली असती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.