AUS vs AFG: ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारणाऱ्या अफगाणिस्तानच्या यशात पडद्यामागील 'या' हिरोंचेही मोठे योगदान

Afghanistan Cricket Team: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला सुपर-8 सामन्यात पराभवाचा मोठा धक्का देत इतिहास रचला. अफगाणिस्तानच्या या यशात अनेक पडद्यामागील सदस्यांचाही मोठा वाटा राहिला.
Afghanistan Cricket Team
Afghanistan Cricket TeamX/ACBofficials
Updated on

Afghanistan Cricket Team Support Staff: अफगाणिस्तान क्रिकेट संघाने टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत मोठी उलथापालथ केली आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला सुपर-8 च्या सामन्यात 21 धावांनी पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या उपांत्य फेरीच्या आशांनाही मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानने बलाढ्य संघाला धक्का देण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी याच स्पर्धेत न्यूझीलंडलाही तब्बल 84 धावांनी पराभूत केले आहे. तसेच आत्तापर्यंत त्यांनी खेळलेल्या 6 सामन्यांत फक्त 2 पराभव पाहिले आहेत.

इतकेच नाही, तर गेल्या काही वर्षापासून अफगाणिस्तानचा संघ दमदार कामगिरी करत असल्याने त्यांना कमी लेखण्याची चूक कोणताही मोठा संघ करताना आता दिसत नाही. पण अफगाणिस्तानच्या यशामागे काही पडद्यामागील सदस्यांचेही मोठे योगदान आहे.

Afghanistan Cricket Team
T20 World Cup: अन् तिथेच इंग्लंडने मॅच गमावली, पाहा द. आफ्रिकेच्या कर्णधाराने मागे पळत येत पकडलेला अविश्वसनीय कॅच

अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षकपद इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू जोनाथन ट्रॉट सांभाळत आहे. त्याने जुलै 2022 मध्ये ही जबाबदारी स्विकारली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाली संघांने मोठी प्रगती केली. त्याच्या मार्गदर्शनाखालीच खेळताना अफगाणिस्तानने 2023 वनडे वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका यांसारख्या बलाढ्य संघाला पराभवाची धूळ चारली होती.

ही कामगिरी पाहाता अफगाणिस्तानने ट्रॉटबरोबरचा करार 2023 वनडे वर्ल्ड कपमध्ये आणखी एका वर्षाने वाढवला असून टी२० वर्ल्ड कपदरम्यानही ट्रॉटच संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.

याशिवाय यंदाच्या टी२० वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तानला ड्वेन ब्रावोचे मार्गदर्शनही मिळाले आहे. या स्पर्धेसाठी अफगाणिस्तानने त्याला गोलंदाजी सल्लागार म्हणून नेमले असून त्याच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या गोलंदाजीत मोठा बदल झाल्याचे दिसले आहे.

अफगाणिस्तानची गोलंदाजी जवळपास सर्वच सामन्यात भेदक दिसली आहे. ऑस्ट्रेलियासारख्या संघालाही त्यांनी अवघ्या 127 धावांवर रोखले, तर न्यूझीलंडला अवघ्या 75 धावांवरच सर्वबाद केले.

Afghanistan Cricket Team
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या सेमीफायनलच्या आशांवर पडणार पावसाचं पाणी? भारताविरुद्धच्या सामन्यावेळी असे आहेत हवामान अंदाज

याशिवाय अफगाणिस्तानच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सध्या दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू अँड्र्यूज पुटीक आणि गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी माजी अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू हमिद हसन सांभाळत आहे.

क्षेत्ररक्षक प्रशिक्षकाची जबाबदारी ऑस्ट्रेलियाच्या शेन मॅकडरमॉटच्या खांद्यावर आहे. या सर्वांनाच प्रशिक्षण क्षेत्राचा चांगला अनुभव असून त्यांचा संघाच्या यशात मोठा वाटा राहिला आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की अफगाणिस्तानला 2023 वनडे वर्ल्ड कपवेळी भारताचे माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांचेही मार्गदर्शन मिळाले होते. ते त्यावेळी मेंटॉर म्हणून संघासह होते.

अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय

दरम्यान, अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 148 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ 19.2 षटकात 127 धावांवरच सर्वबाद झाला.

हा अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध मिळवलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलाच विजय ठरला. यापूर्वी अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कधीही विजय मिळवता आला नव्हता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()