Jos Buttler : 1,6,6,6,6,W,6... घाईत असलेल्या बटलरनं युएसएला कुटलं, सेमी फायनल गाठण्यात इंग्लंडचा पहिला नंबर

T20 World Cup 2024 : जॉस बटलरचे एकाच षटकात 5 षटकार तर जॉर्डनने एकाच षटकात घेतल्या 4 विकेट्स, इंग्लंड पोहला सेमी फायनलमध्ये
Jos Buttler
Jos Buttler ENG vs USA esakal

Jos Buttler ENG vs USA : इंग्लंडने युएसएचे 116 धावांचे आव्हान 10 विकेट्स अन् 10 षटके राखून पार करत टी 20 वर्ल्डकप 2024 ची सेमी फायनल गाठली. इंग्लंडचा संघ हा सेमी फायनल गाठणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र इंग्लंड हा यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये सेमी फायनल गाठणारा पहिला संघ ठरला.

इंग्लंडच्या विजयात जॉस बटलर आणि ख्रिस जॉर्डन यांनी महत्वाची भुमिका बजावली. बटलरने 38 चेंडूत नाबाद 83 धावा ठोकल्या. यात 7 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश आहे. या 7 षटकारांपैकी 5 षटकार हे हरमीत सिंगच्या एकाच षटकातले आहेत. 9 वे षटक टाकणाऱ्या हरमीतला बटलरने चांगलेच धुतले. त्याने सलग 5 षटकार मारत षटकात 32 धावा वसूल केल्या.

Jos Buttler
IND vs AUS Playing 11 : ऑस्ट्रेलियाविरूद्ध मोहम्मद सिराजची लागणार वर्णी; कुलदीप यादवला सोडावे लागणार स्थान?

युएसएविरूद्धच्या सामन्यात इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करताना युएसएला 116 धावात गुंडाळलं. इंग्लंडने पहिल्यापासूनच युएसएला धक्के देत सामन्यावर पकड निर्माण केली होती. इंग्लंडने युएसएची अवस्था 3 बाद 56 धावा अशी केली होती. इंग्लंडकडून आदिल राशिदने दोन विकेट्स घेत युएसएची मधली फळी उडवली.

मात्र कोरी अँडरसनने 29 धावांची खेळी करत संघाला सावलं. हरमीत सिंगने 21 धावा करत अँडरसनला चांगली साथ दिली होती. या दोघांच्या खेळीमुळं युएसए शंभरी गाठू शकला.

मात्र 19 वे षटक टाकणाऱ्या ख्रिस जॉर्डनने भेदक मारा करत एकाच षटकात 4 विकेट्स घेत युएसएचा डाव संपवला. त्यानं सलग तीन विकेट्स घेत टी 20 वर्ल्डकपमधील आपली पहिली हॅट्ट्रिक घेतली. जॉर्डनची ही हॅट्ट्रिक टी 20 वर्ल्डकप 2024 मधील तिसरी हॅट्ट्रिक ठरली. यापूर्वी पॅट कमिन्सने सलग दोन सामन्यात दोन हॅट्ट्रिक घेतल्या आहेत.

Jos Buttler
Chris Jordan Hat Trick: नेत्रावळकरचा त्रिफळा उडवत जॉर्डनची हॅट्ट्रिक

युएसएला 116 धावात रोखल्यानंतर इंग्लंडने आपल्या डावाची सुरूवात संथ केली. पहिल्या दोन षटकात इंग्लंडला फक्त 5 धावाच करता आल्या होत्या. मात्र त्यानंतर जॉस बटलर फिल्प सॉल्टने गिअर बदलला. या दोघांनी तुफान फटकेबाजी सुरू केली. जॉस बटलरने तर 218 च्या स्ट्राईक रेटने युएसएच्या गोलंदाजांना कुटले.

त्याने 38 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. त्यात 6 चौकार आणि तब्बल 7 षटकारांचा समावेश होता. त्याला साथ देणाऱ्या सॉल्टने 21 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या. इंग्लंडने 116 धावांचे आव्हान 9. 4 षटकात पार केले. इंग्लंडने सामना 10 विकेट्स आणि 10.2 षटके राखून जिंकला. इंग्लंडचे आता 3 सामन्यात 4 गुण झाले असून ते सेमी फायनलसाठी पात्र झाले आहेत.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com