Mitchell Marsh : ऑस्ट्रेलिया करणार सेटिंग अन् इंग्लंड स्पर्धेतून बाहेर; कर्णधार मार्शवर आयसीसी बंदी घालणार?

Mitchell Marsh T20 World Cup 2024 : हेजलवूड म्हणाला तसं ऑस्ट्रेलियाने केलं तर मार्शवर होणार कारवाई अन् फायदा होणार भारताचा?
Mitchell Marsh
Mitchell Marsh T20 World Cup 2024esakal
Updated on

Mitchell Marsh T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉश हेजलवूडने आज ऑस्ट्रेलिया स्कॉटलँडविरूद्धच्या सामन्यात सेटिंग करणार असल्याची हिंट दिली. या सामन्यानंतर इंग्लंडचे आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

हेडलवूड नामिबियाविरूद्धच्या सामन्यानंतर बोलताना म्हणाला की, 'या स्पर्धेत तुमचा इंग्लंडविरूद्ध पुन्हा एकदा सामना होण्याची शक्यता आहे. तो सर्वोत्तम संघापैकी एक संघ आहे. आम्ही टी 20 मध्ये च्यांच्याविरूद्ध संघर्ष करतो. त्यांना आम्ही स्पर्धेतूनच बाहेर काढू शकलो तर आम्हाला वर्ल्डकप जिंकण्याची चांगली संधी आहे.'

हेजलवूड पुढे म्हणाला की, 'आम्ही इंग्लंडला स्पर्धेतून बाहेर काढण्याच्या स्थितीत आहोत का नाही हे पाहणे रंजक ठरणार आहे. मला माहिती नाही आम्ही आहोत की नाही. आम्ही यबाबत चर्चा केली आहे किंवा नाही किंवा आम्ही तसं करण्याचा प्रयत्न करणार आहोत की नाही हे ठरवणं माझ्या हातात नाही.' हेजलवूडने जरी मद्दाम कमी मार्जिनने हरण्याकडे इशार केला असला तरी अशा कृतीचा त्यांच्या कर्णधारावर मोठा परिणाम होऊ शकतो.

Mitchell Marsh
USA vs IND T20 WC 2024 : सूर्या तळपला; बॉल टू रन मॅचमध्ये केली संयमी खेळी, भारताचा सुपर 8 मध्ये प्रवेश

इंग्लंडला आता ओमान आणि नामिबियाविरूद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे. हा सामना फक्त जिंकून उपयोग नाही तर त्यांना चांगल्या नेट रनरेटने दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्यांना त्यांचे नेट रनरेट हे स्कॉटलँडपेक्षा चांगलं ठेवावं लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाने आपला तिसरा सामना जिंकून आधीच सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ग्रुप B मध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. आता ते स्कॉटलँडचा कमी मार्जिनने पराभव करून इंग्लंडचा खेळ खल्लास करण्याच्या तयारीत आहेत.

मात्र ऑस्ट्रेलियाला आयसीसीच्या नियमाकडे देखील लक्ष द्यावं लागणार आहे. जर ऑस्ट्रेलियाने आयसीसीचा नियम मोडला तर मिचेल मार्शवर दोन सामन्याची बंदी येऊ शकते.

Mitchell Marsh
T20 World Cup 2024 : आयसीसीचा दणका; सामन्यादरम्यान इम्रान खान प्रेमींवर असं करण्यास घातली बंदी

आयसीसीच्या कलम 2.11 नुसार, सामन्याचा निकालात अयोग्य रणनिती आखून छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर आयसीसी कारवाई करू शकते. यात साखळी फेरीतील सामन्यात दुसऱ्या संघाच्या स्थानावर परिणाम होण्यासाठी मुद्दाम सामना हरणे याचा देखील समावेश आहे. तसेच हा नियम नेट रनरेटमध्ये देखील मुद्दाम छेडछाड केली तरी देखील लागू होतो.

नियमानुसार दोषी आढळल्यास संघ आणि खेळाडूंवर 50 टक्के मॅच फी दंड म्हणून आकारला जाऊ शकतो. ही किमान शिक्षा आहे. तर कमाल शिक्षा ही दोन सामन्यासाठी बंदी अशी असू शकते. त्यामुळे जर ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँडविरूद्धच्या सामन्यात मुद्दाम कमी मार्जिनने हरण्याचा प्रयत्न केला तर मार्शला सुपर 8 मधील पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.