Pakistan Cricket Team : पाकिस्तानविरूद्ध खेळण्यापेक्षा आयपीएल बरं; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं वक्तव्य, अकमलनंही दिला पाठिंबा

ENG vs PAK T20 Series : इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं वक्तव्य पाकिस्तान क्रिकेटच्या जिव्हारी लागलं.
michael vaughan
ENG vs PAK T20 Seriesesakal
Updated on

Pakistan Cricket Team T20 World Cup 2024 : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने सध्या सुरू असलेल्या इंग्लंड विरूद्ध पाकिस्तान यांच्यातील टी 20 मालिकेवर एक जळजळीत वक्तव्य केलं होतं. त्याने पाकिस्तानसोबत टी 20 मालिका खेळण्यापेक्षा आयपीएल खेळलेलं बरं असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याला आता पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमलने देखील एक प्रकारे पाठिंबाच दिला.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या खेळाडूंना पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेसाठी परत बोलावण्यापेक्षा आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी द्यायला हवी होती. त्यांना तिथं आगामी टी 20 वर्ल्डकपची चांगली तयारी करता आली असती असे मत मायकल वॉनने व्यक्त केले होते.

michael vaughan
T20 World Cup 2024 : संदीप लामिछानेला व्हिसा नाकारला; नेपाळमध्ये युएसविरूद्ध सुरू झालं तीव्र आंदोलन

या वक्तव्याला पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमलने आपल्या यूट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओत पाठिंबा दर्शवला. तो म्हणाला, 'गेल्या काही दिवसांपासून मला इंग्लंडच्या माजी कर्णधाराने पाकिस्तान क्रिकेटला इतक्या हलक्यात कसं घेतलं याचं आश्चर्य वाटत होतं. हे खूप वेदनादायी होतं. मात्र त्याचा अंदाज खरा ठरला.'

अकमल पुढं म्हणाला की, 'सगळ्यांना पाकिस्तान क्रिकेटचा स्तर माहिती आहे. आपण आयर्लंडसारख्या छोट्या संघाकडून हरलो. आता वॉन म्हणतो की पाकिस्तानविरूद्ध खेळणं तितकं आव्हानात्मक नव्हतं. या सर्वाला आपणच जबाबदार आहोत. जर आपल्याऐवजी न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका किवा भारत असता तर वॉनने असं वक्तव्य केलं नसतं.

'आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आयपीएलमध्ये 40 ते 50 हजारांमधून बेस्ट बॉलर आणि बॅटर निवडले जातात. त्यामुळं आयपीएल हे आव्हानात्मक आहे तिथे दर्जेदार क्रिकेट खेळलं जातं.'

michael vaughan
T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

अकमलने वॉनचे वक्तव्य हे पाकिस्तान संघाने प्रेरणेचा स्त्रोत बनवावं असं वक्तव्य केलं. पाकिस्ताननं आगामी टी 20 वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवावी. नाहीतर युएसए सारखा संघ देखील आपल्याला हलक्यात घेऊ लागेल.

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.