Kedar Jadhav Retirement : टी-20 वर्ल्ड कपदरम्यान केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती!

Kedar Jadhav Retirement News : टीम इंडियाचा अष्टपैलू फलंदाज केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Kedar Jadhav Retirement
Kedar Jadhav Retirementsakal
Updated on

Kedar Jadhav Retirement : टीम इंडियाचा अष्टपैलू फलंदाज केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. 39 वर्षीय खेळाडूने भारतासाठी शेवटचा सामना 8 फेब्रुवारी 2020 रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.

Kedar Jadhav Retirement
Baharampur Constituency Lok Sabha Election Result : अधीर रंजन चौधरी यांच्या 'बालेकिल्ला'ला युसूफ पठाणने लावला सुरूंग

केदार जाधवने 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 16 नोव्हेंबर 2014 रोजी रांची येथे श्रीलंकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. 73 एकदिवसीय सामन्यांमध्ये जाधवने 42.09 च्या सरासरीने 1389 धावा केल्या. या काळात त्याने दोन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली. यादरम्यान त्याने 27 विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय T20 बद्दल बोलायचे तर जाधवने नऊ सामन्यात 123.23 च्या स्ट्राईक रेटने 58 धावा केल्या.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जाधवने आपल्या लिस्ट-ए कारकिर्दीत 186 सामन्यांच्या 159 डावांमध्ये सुमारे 46 च्या सरासरीने 5,520 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 10 शतके आणि 33 अर्धशतकेही केली आहेत. त्याने 27 फेब्रुवारी 2008 रोजी गुजरात क्रिकेट संघाविरुद्ध लिस्ट-ए क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. पदार्पणाच्या सामन्यात त्याने 15 चेंडूत 19 धावा केल्या.

Kedar Jadhav Retirement
T20 World Cup: सुपर ओव्हरचा हिरो! बॅटिंगच नाही, तर बॉलिंगनेही पालटली मॅच, नामियाबियासाठी 39 वर्षीय खेळाडू ठरला तारणहार

केदारची जाधवची आयपीएल कारकीर्द कशी राहिली?

केदार जाधवने 2010 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. या आयपीएल कारकिर्दीत त्याने 93 सामने खेळले. त्यात 22.15 च्या सरासरीने आणि 123.17 च्या स्ट्राइक रेटने 1,196 धावा केल्या. या कालावधीत त्याने सर्वाधिक 69* धावांसह 4 अर्धशतके झळकावली. त्याने आपल्या T-20 क्रिकेट कारकिर्दीत 163 सामने खेळले असून, 24.45 च्या सरासरीने आणि 129.53 च्या स्ट्राइक रेटने 2,592 धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com