Team India Prize: महाराष्ट्र शासनाकडून जगज्जेत्या टीम इंडियाला 11 कोटींचं बक्षीस, मुख्यमंत्री शिंदेची मोठी घोषणा

Maharashtra Government Announces Prize for T20 World Cup Winning Indian Team: महाराष्ट्र शासनाकडून टी२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाला ११ कोटींचे बक्षीस देण्यात येणार आहे.
Maharashtra Government Announces Prize for T20 World Cup Winning Indian Team
Maharashtra Government Announces Prize for T20 World Cup Winning Indian TeamSakal

T20 World Cup 2024 Winner Team India: भारतीय क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा २९ जून रोजी जिंकली. या स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केले. भारतीय संघाने तब्बल १७ वर्षांनी टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले. यासाठी आता महाराष्ट्र शासनाकडून भारतीय संघाला मोठं बक्षीस देण्यात आलं

या ऐतिहासिक विजयासह भारतीय संघ गुरुवारी मायदेशी परतला. यानंतर शुक्रवारी महाराष्ट्र सरकारकडून भारतीय संघाचं कौतुक करण्यात आलं.

याबरोबरच टी२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघात असलेल्या महाराष्ट्रातील खेळाडू रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे व मसाज थेरपिस्ट अरुण कानडे यांचाही महाराष्ट्र शासनाकडून सत्कार करण्यात आला.

Maharashtra Government Announces Prize for T20 World Cup Winning Indian Team
Team India: 'वेडेपणा...!' चाहत्यांची गर्दी पाहून मुंबईचा राजा रोहितही गहिवरला, BCCI ने शेअर केला ओपन बसमधील Video

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर विधान भवनातही या खेळाडूचे आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांचा गौरव सोहळा पार पडला. दरम्यान, यापूर्वीच महाराष्ट्राच्या चारही खेळाडूंना १ कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली होती.

यानंतर आता विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी संपूर्ण भारतीय संघासाठी ११ कोटींच्या बक्षीस रकमेची घोषणा केली. त्याचबरोबर आगामी काळात नव्या स्टेडियमसाठी जमीनीची वैगरे गरज भासल्यास त्यासाठीही मदतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता मुंबईत आणखी एक स्टेडियम उभारायला हवं, असं म्हटलं होतं. यावेळी त्यांनी असंही म्हटलेलं की मुंबईत आता १ लाख प्रेक्षक क्षमता असलेलं स्टेडियम व्हायला हवं.

Maharashtra Government Announces Prize for T20 World Cup Winning Indian Team
T20 World Cup Final: ऋषभ पंतच्या चतुराईचा झाला फायदा अन् क्लासेनची गेली विकेट, गावसकरांनी सांगितलं कोणता क्षण ठरला महत्त्वाचा

तत्पूर्वी विधान भवनात जेव्हा खेळाडूंचं आगमन झालं होतं, तेव्हा त्यांच्या नावानं घोषणाही देण्यात आल्या होत्या. यावेळी नेते एकमेकांमधील वाद विसरून खेळाडूंचं कौतुक करताना दिसले.

बीसीसीआयकडूनही मिळालंय मोठं बक्षीस

दरम्यान, टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकलेल्या भारतीय संघासाठी बीसीसीआयनेही मोठं बक्षीस दिलं आहे.

बीसीसीआयने भारतीय संघासाठी १२५ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेची घोषणा केली होती. हे बक्षीस गुरुवारी मुंबईतील विजयी मिरवणूकीनंतर वानखेडे स्टेडियमवर झालेल्या खेळाडूंच्या सत्कार सोहळ्यावेळी भारतीय संघाकडे सुपूर्त करण्यात आले होते.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com