Mahela Jayawardene resigns as consultant coach of Sri Lanka : 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंका क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. वानिंदू हसरंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला होता. त्यांना सुपर-8 फेरीसाठी पात्र ठरविण्यात यश आले नाही. टी-20 वर्ल्ड कप 2024 मधील या लाजिरवाण्या कामगिरीनंतर श्रीलंका क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाला आहे.
जवळपास गेली दोन वर्षे श्रीलंका संघासोबत असलेला माजी कर्णधार महेला जयवर्धने याने आता पद सोडण्याचा निर्णय घेतला असून क्रिकेट सल्लागार प्रशिक्षक पदाचाही राजीनामा दिला आहे. जयवर्धनेने या वर्षाच्या सुरुवातीला आपला कार्यकाळ एक वर्ष वाढवण्यास सहमती दर्शवली होती. परंतु आता अवघ्या सहा महिन्यांनंतर पद सोडले आहे. या मागचे खरे कारण समोर आलेले नाही.
महेला जयवर्धनेची कोचिंग कारकीर्द
महेला जयवर्धनेने 2014 मध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीला अलविदा केला, पुढच्याच वर्षी तो फलंदाजी सल्लागार म्हणून इंग्लंड संघात सामील झाला. याशिवाय, जयवर्धने 2017 मध्ये आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक बनले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एमआयने 2017 मध्ये आयपीएल विजेतेपद जिंकले. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ते खुलना टायटन्सचे मुख्य प्रशिक्षकही राहिले आहेत.
2021 मध्ये, त्याला श्रीलंका क्रिकेट बोर्डाने देशाच्या अंडर-19 संघाचा सल्लागार म्हणून नियुक्त केले, ज्यासाठी त्याने कोणतेही शुल्क आकारले नाही. त्याच वेळी 2021 टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या फेरीदरम्यान त्याने श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघाच्या सल्लागाराची भूमिका बजावली. शेवटी सप्टेंबर 2022 मध्ये त्याची श्रीलंकेच्या अंडर-19 आणि वरिष्ठ संघाचे सल्लागार प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.