‘भाईनच भावाची लावली ना’; सेमिफायनल प्रवेश हुकल्यावर ‘मिम्स’

mims
mimsmims
Updated on

नागपूर : टी ट्वेंटी वर्डकपमध्ये रविवारी अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर भारतीय प्रेक्षकांची नजर होती. अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केल्यास भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्‍चित होणार या आशेवर क्रिकेटप्रेमींनी सामना बघितला. मात्र, शेवटी निराशाच पदरी पडल्याने सामाजिक माध्यमावर मिम्सचा पाऊस पडला. तर ‘भाईनच भावाची लावली ना’ अशा प्रतिक्रिया उमटल्या.

दोन दिवसांपासून भारत कसा सेमिफायनलमध्ये प्रवेशाचे किती मार्ग आहेत, यावर खमंग चर्चा रंगली होती. यामध्ये अफगाणिस्तान भारताचा तारणहार ठरणार असल्याचा कयास लावण्यात आला. ‘तसे तू है मेरा भाई’ असे मिम्सही आलेत. अनेकांनी तर फायनलची स्वप्ने पाहण्यासही सुरुवात केली. अनेकांनी भारतामुळेच ‘टी ट्वेंटी वर्डकप’ला ‘टीआरपी’ असेल अशी कारणेही क्रिकेटप्रेमी देऊ लागलेत.

mims
शवगृहात १०० मृत महिलांशी शारीरिक संबंध; बनवले व्हिडिओ

रविवारी दुपारी असलेला अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर क्रिकेटप्रेमींच्या नजरा होत्या. मात्र, काही वेळातच अनेकांना अफगाणिस्तानचा पराभव दिसू लागल्याने त्यांनी सेमीफायनलमध्ये भारताच्या प्रवेशाची आशाच सोडली. त्यावेळी सामाजिक माध्यमावर याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली.

सामाजिक माध्यमावर म्हणजे विराट कोहली, रोहित शर्मा आणि टीमचा मेंटॉर असलेला महेंद्रसिंग धोनी हे ‘एमएच ४०’ म्हणजे नागपूर ग्रामीणमधून जात असल्याचे ‘मिम्स’ सर्वाधिक व्हायरल ‘मिम्स’ होय. यापाठोपाठ पहिल्या सामन्यापासून सुरू असलेले ‘तिकीट दे भाई घर जाना है’, ‘टीम इंडिया को कमबॅक के लिए दोही रास्ते - एक शारजा ते दिल्ली, एक शारजा ते मुंबई’ या आशयाचे ‘मिम्स’ फिरत होते. याशिवाय अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यामुळे भारताची झालेली अवस्था याबाबतही सामाजिक माध्यमावर क्रिकेटप्रेमींकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.