Cricket Video: लाईव्ह सामन्यातच मोठी दुर्घटना, जबरदस्त सिक्स ठोकल्यानंतर लगेचच फलंदाजाने गमवला जीव; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Cricketer dies of during cricket match: मुंबईमध्ये एका खेळाडूला सामना खेळतानाच जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे.
Cricket
CricketSakal
Updated on

Cricketer dies of during cricket match: क्रिकेटमध्ये अनेकदा खेळाडू मैदानात खेळताना दुखापतग्रस्त होत असतात. पण खूप क्वचितच असं झालं आहे की क्रिकेट खेळतानाच एखाद्याला आपला जीव गमवावा लागला आहे. तथापि, अशीच एक दुर्दैवी घटना मुंबईमध्ये घडल्याचे समोर आले आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे क्रिकेटविश्व हळहळले आहे. या व्हिडिओमध्ये एका फलंदाजाने मैदानातच जीव गमावल्याचे दिसत आहे. जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात दिसतेय की गोलंदाज अंडरआर्म गोलंदाजी करत असून त्यावर फलंदाजाने षटकार मारला.

Cricket
NAM vs OMA T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपच्या तिसऱ्याच मॅचमध्ये रंगली सुपर-ओव्हर! रोमांचक सामन्यात नामिबियाचा विजय

यावेळी तो चेंडूकडे पाहात असताना अचानकच तो खाली कोसळला. त्याला खाली कोसळल्याचे पाहून आजूबाजूचे खेळाडू आणि इतर लोक लगेचच धावत त्याच्या जवळ आले. दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ असून याची पुष्टी सकाळ करत नाही.

दरम्यान, या घटनेनंतर त्या फलंदाजाला जीव गमवावा लागल्याचे समजत आहे. मात्र फलंदाजाच्या मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही काही रिपोर्ट्सनुसार प्राथमिक अंदाज हृदयविकाराचा झटका असल्याचे म्हटले जात आहे.

तसेच ही घटना मुंबईतील मीरा रोडच्या भागातील असल्याचे म्हटले जात आहे.

Cricket
Kedar Jadhav Retirement : टी-20 वर्ल्ड कपदरम्यान केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती!

पहिलीच घटना नाही

दरम्यान, मैदानात हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूचा जीव जाण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. केवळ क्रिकेटमध्येच नाही, तर इतर खेळांबाबतही अशा घटना घडल्याचे दिसले आहे.

तसेच बऱ्याचदा सामना खेळत असताना झालेल्या दुखापतीमुळे काही खेळाडूंनी जीव गमावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.