Netherlands vs South Africa : टी 20 वर्ल्डकप 2024 मध्ये मोठमोठ्या संघांना मोठमोठे धक्के बसत आहेत. न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या नेदरलँड्स विरूद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात देखील मोठ्या धक्कादायक घडामोडी घडत आहेत. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेदरलँड्सला 104 धावात गुंडाळलं. मात्र त्यानंतर नेदरलँड्सनं देखील जोरदार पलटवार करत दक्षिण आफ्रिकेची अवस्था 4 बाद 12 धावा अशी केली.ट्रिस्टन स्टब्ज आणि डेव्हिड मिलर हे आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी नेदरलँड्सला 104 धावात रोखण्यात यश मिळवलं. दक्षिण आफ्रिकेकडून ओटनिल बार्टमनने भेदक मारा करत 4 विकेट्स घेतल्या. तर मार्को येनसेन आणि नॉर्खियाने प्रत्येकी 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.
नेदरलँड्सची अवस्था 6 बाद 48 धावा अशी झाली होती. त्यावेळी नेदरलँड्स शंभरी पार करू शकणार नाही असं वाटत होतं. मात्र सयब्रँड एन्जलब्रेच्टने (Sybrand Engelbrecht) 40 धावांची खेळी केली. त्याला बीकने 23 धावा करत चांगली साथ दिली. त्यामुळं नेदरलँड्सने 20 षटकात 9 बाद 103 धावांपर्यंत पोहचवलं.
नेदरलँड्सचे विजयासाठीचे 104 धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला नेदरलँड्सने सुरूवातीलाच मोठे धक्के दिले. त्यांची अवस्था 4 बाद 12 धावा अशी केली. ट्रिस्टन स्टब्ज आणि डेव्हिड मिलर यांनी पाचव्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी रचत संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र चेंडू आणि धावा यांच्यातील अंतर दक्षिण आफ्रिकेची डोकेदुखी ठरणार असं वाटत होतं. तेवढ्यात स्लॉग ओव्हरमध्ये लिडेने स्टब्जला (33 धावा) बाद करत मोठा धक्का दिला. पाठोपाठ मार्को येनसेन देखील बाद झाला. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेची अवस्था 6 बाद 88 धावा अशी झाली.
आफ्रिकेला विजयासाठी 12 चेंडूत 16 धावांची गरज होती. मिलर 40 धावा करून क्रिजवर टिकून होता. त्यानं 19 व्या षटकात दोन षटकार मारत अखेर दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. त्यानं 51 चेंडूत 59 धावा केल्या. नेदरलँड्सकडून किगमा आणि बीकने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.