NewYork Stadium : वर्ल्डकप सुरू असतानाच न्यूयॉर्कचं क्रिकेट स्टेडियम पाडलं; काय आहे यामागचं कारण?

NewYork Nassau Cricket Stadium : याच नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर भारत - पाकिस्तान सामना रंगला होता. त्याची खेळपट्टी वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.
New York Cricket Stadium
T20 World Cup 2024 New York Cricket Stadium esakal
Updated on

T20 World Cup 2024 New York Cricket Stadium : टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक चर्चेत राहिलेले नासाऊ कौंटी क्रिकेट स्टेडियम येत्या काही दिवसांत नियोजनानुसार पाडण्यात येणार आहे. भारत-आणि यजमान अमेरिका यांच्यात बुधवारी सामना झाला आणि लगेचच तेथे बुलढोझर्स दाखल झाले.

काही स्टेडियम उभारण्यासाठी किमान दोन-तीन वर्षे तरी लागतात, पण न्यूयॉर्कमधील ३४ हजार प्रेक्षक संख्येचे हे नासाऊ स्टेडियम अवघ्या १०६ दिवसांत उभारण्यात आले. मुळात रिकामे मैदान असल्यामुळे ड्रॉप इन खेळपट्ट्या वसवण्यात आल्या. हे भव्य स्टेडियम ९३० एकरमध्ये तयार करण्यात आले.

New York Cricket Stadium
Virat Kohli : तीन सामन्यात फेल याचा अर्थ... विराटच्या खराब कामगिरीवर गावसकर नेमकं काय बोलले?

आठ सामन्यांसाठी अट्टाहास

या स्टेडियमवर विश्वकरंडक स्पर्धेतील एकूण आठ आणि दान सराव सामने झाले. त्यासाठी दहा ड्रॉप इन खेळपट्ट्या होत्या. या खेळपट्ट्या बाहेर तयार करण्यात आल्या आणि स्टेडियममध्ये बसवण्यात आल्या, पण त्या पूर्णपणे चांगल्या नव्हत्या. परिणामी भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या ११९, तर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध केलेल्या ११३ धावाही निर्णायक ठरल्या. चेंडू कमी अधिक प्रमाणात उडत असल्यामुळे फलंदाजांच्या हातालाही चेंडू लागत होते.

स्टेडियम उभारणीतील साहित्य लास वेगासला गोल्फ स्पर्धेसाठी वापरण्याकरिता पाठवण्यात येणार आहे, मात्र ड्रॉप इन खेळपट्ट्या येथेच ठेवण्यात येतील. त्यामुळे जेथे स्टेडियम उभारण्यात आले ते आयझेनहॉवर पार्क पुन्हा रिकाम्या मैदानाप्रमाणे असणार आहे.

सहा आठड्यांत पाडकाम

१०० दिवसांत उभारण्यात आलेले हे स्टेडियम सहा आठवड्यांत पाडण्यात येणार आहे आणि त्याचे काम गुरुवारपासून सुरूही करण्यात आले. ९ जून रोजी झालेला भारत-पाक हा सामना या स्टेडियमसाठी ऐतिहासिक ठरला. सामन्याची तिकिटे २५०० ते १० हजार डॉलर इतक्या किमतीला विकण्यात आली होती.

New York Cricket Stadium
Pakistan Cricket Team : पाकिस्तान संघावर चालणार देशद्रोहाचा खटला? पाकिस्तानमधील माध्यमांचा दावा

भारताचे चार सामने

भारतीय संघ येथे एकूण चार सामने खेळला. त्यातील एक सामना बांगलादेशविरुद्धचा सराव सामना होता, तर तीन सामने प्रत्यक्ष स्पर्धेतील होते.

२०२३ मध्ये आयसीसीने न्ययॉर्कचे हे ठिकाण स्पर्धेसाठी निश्चित केले. त्यानंतर बरोबर १०६ दिवसांत स्टेडियम उभारून पूर्ण झाले होते. प्लोरिडाहून खास गवत आणून मैदान तयार करण्यात आले. लास वेगास फॉर्म्युला-१ स्पर्धा आणि गोल्फ स्पर्धांतील स्टेडियमचे साहित्य आणून नासाऊ स्टेडियमचे स्टँड तयार करण्यात आले होते.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.