अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीस सोहळा पार पडला. या ग्रँड सोहळ्याला अनेक सेलेब्सनी हजेरी लावली होती. यामध्ये विश्वविजेता भारतीय संघदेखील सामील झाला होता. अभूतपुर्व कामगिरीनंतर मोठ्या जल्लोषात भारतीय संघाचे मायदेशी स्वागत करण्यात आले. या सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अशातच अजून व्हिडीओ चर्चेत आला आहे. तो म्हणजे अंबानी कुटुंबाच्या सोहळ्यातील.
या सोहळ्यामध्ये भारतीय संघाला पाहून निता अंबानी काहिश्या भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. हिटमॅनला मिठी मारून रडू लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनंत आणि राधिकाचा संगीत सोहळा 5 जुलैला मुंबईतील NMACC येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला भारतीय संघाने हजेरी लावली होती. संपूर्ण विश्वविजेती टीम या सोहळ्यात आपल्या कुटुंबासोबत सहभागी झाली होती. यावेळी, सोहळ्यात एन्ट्री करताना संघाच अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. यावेळी मंत्रोपच्चार, टीका, आरती, हर हर महादेवच्या जयघोषत संघाचे स्वागत केले.
त्यानंतर संगीत सोहळ्या दरम्यान, निता अंबानी यांनी तीन खेळाडूंना स्टेजवर बोलावले होते. यावेळी स्टेजवर रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या दिसले. रोहित स्टेजवर पोहोचला तेव्हा बॅकग्राउंडमध्ये लहरा दो…लहरा दो… हे गाणं वाजत होतं. यावेळी निता अंबानी यांनी खेळाडूंचे कौतुक करत रोहित शर्माला मिठी मारली. तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रु तरळले. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
यावेळी निता अंबानी हार्दिक पांड्यालाही पाहून भावूक झाल्या. कठीण काळ जास्त दिवस राहत नाही. अशा शब्दात त्यांनी त्याचं कौतुक केलं. गेल्या काही दिवसांपासून हार्दिकला ट्रोल करण्यात येत होते.
टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद भारतीय संघाने पटकावले. शनिवारी (२९ जून) बार्बाडोसच्या केन्सिंगटन ओव्हलवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केले आणि दुसऱ्यांदा टी२० वर्ल्डकप विजयाला गवसणी घातली. त्यामुळे रोहित शर्मा टी२० वर्ल्ड कप जिंकणारा भारताचा एमएस धोनीनंतरचा दुसराच कर्णधार ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.