French Open 2024 : नोवाक जोकोविचची दुखापतीमुळे माघार; सलग पाच सेटच्या झुंजीनंतरचे पडसाद

Novak Djokovic withdraws from French Open 2024 : अव्वल मानांकित व गतविजेता नोवाक जोकोविच याने मंगळवारी अखेर फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅममधून माघार घेतली.
Novak Djokovic
Novak Djokovic
Updated on

Novak Djokovic withdraws from French Open 2024 : अव्वल मानांकित व गतविजेता नोवाक जोकोविच याने मंगळवारी अखेर फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅममधून माघार घेतली. फ्रान्सिस्को सिरनडोलो याच्याविरुद्धच्या सामन्यात जोकोविचने पाच सेटच्या झुंजीनंतर विजय मिळवला. मात्र या लढतीदरम्यान त्याचा उजव्या पायाचा गुडघा दुखावला. या दुखापतीमधून तो सावरला नाही. अखेर त्याने या स्पर्धेत पुढे न खेळण्याचा निर्णय घेतला.

Novak Djokovic
Rohit Sharma: टी20 वर्ल्ड कप हिटमॅनसाठी ठरणार विक्रमी! एक-दोन नाही, तर रोहितला 4 मोठे विक्रम करण्याची सुवर्णसंधी

नोवाक जोकोविच याने सलग दोन फेऱ्यांमध्ये पाच सेटच्या थरारानंतर विजयाला गवसणी घातली. शनिवारी मध्यरात्री तिसऱ्या फेरीच्या लढतीत लोरेंझो मुसेटी याच्यावर पाच सेटच्या झुंजीनंतर विजय मिळवल्यानंतर जोकोविचला सोमवारी मध्यरात्री पुन्हा पाच सेटचा सामना करावा लागला. जोकोविच याने फ्रान्सिस्को सिरनडोलो याचे कडवे आव्हान ६-१, ५-७, ३-६, ७-५, ६-३ अशा पाच सेटमध्ये परतवून लावले.

Novak Djokovic
Yusuf Pathan: मेरा भाई जीत गया! युसूफ खासदार बनताच धाकटा भाऊ इरफानची भावुक पोस्ट

पहिला सेट जिंकल्यानंतर जोकोविचवर पुढील दोन सेट गमावण्याची आपत्ती ओढवली होती, पण यामधून बाहेर येत त्याने चौथा व पाचवा सेट आपल्या नावावर केला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, मात्र आता तो उपांत्यपूर्व फेरीत खेळणार की नाही याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते.

पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला असह्य वेदना होत होत्या. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याबाबत स्वत: जोकोविचही ठाम नव्हता. अखेर स्पर्धा संयोजकांकडून सोशल माध्यमावर जोकोविचची माघार घेण्याबाबत माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.