लक्षात ठेवा पहिला देश मग IPL; कपिल पाजींचा टीम इंडियाला डोस

सध्याच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपले आहे. पण ..
Kapil Dev
Kapil Dev Sakal
Updated on

UAE मध्ये रंगलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup 2021) भातीय संघाचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. भारतीय संघाच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांप्रमाणे कपिल पाजींनीही (Kapil Dev) नाराजी व्यक्त केली आहे. संघातील बहुतांश खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यास अधिक प्राधान्य देत आहेत. खेळाडूंनी देशासाठी खेळण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे, असा सल्ला 1983 मध्ये भारतीय संघाला पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांनी दिलाय.

एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात कपिल देव म्हणाले की, सध्याच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपले आहे. पण आता आपल्याला तरी आगामी स्पर्धेसाठी आतापासूनच तयारी सुरु करायला हवी, ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचे प्लॅनिंग हे आतापासूनच करायला पाहिजे. ही वेळ भविष्यात काय करायचे याचा विचार करायला लावणारी आहे. यावेळी त्यांनी आयपीएल स्पर्धेवरही भाष्य केले. आयपीएल आणि वर्ल्ड कप स्पर्धा यात अंतर असायला हवे. आयपीएलमुळे खेळाडूंना खूप प्रसिद्धी मिळाली. याचा त्यांना फायदा करुन घेता आला नाही.

Kapil Dev
स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला पद्मभूषण पुरस्कार प्रदान

जरी आयपीएलमुळे प्रसिद्धी मिळत असली तरी देशाकडून खेळण्याला पहिले प्राधान्य देणे गरजेचे आहे. याचा खेळाडूंनी विचार करावा. देशाचे प्रतिनिधीत्व करणे ही प्रत्येक खेळाडूसाठी अभिमानास्पद बाब असते. प्राथमिकता समजून घेऊन खेळाडूंनी भविष्याचा विचार करावा, असा सल्ला कपिल पाजींनी दिलाय.

Kapil Dev
T20 World Cup : षटकार देण्याची आणि विकेट घेण्याची रबाडाची हॅट््ट्रिक

युएईमध्ये रंगलेल्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघातील खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त होते. आयपीएल स्पर्धा संपवून ते वर्ल्ड कपसाठी सज्ज झाले. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धा ही युएईच्या मैदानात रंगल्यामुळे भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत फायदा होईल, अशी चर्चा वर्ल्ड कपपूर्वी रंगली होती. पण ही चर्चा स्पर्धा सुरु झाल्यावर फोल ठरली. भारतीय संघाने सलामीच्या दोन्ही लढती गमावल्या आणि स्पर्धेतील दरवाजे सुरुवातीलाच बंद झाले. भारतीय संघाच्या पराभवास आयपीएल कारणीभूत असल्याचा सूर उमटू लागला. कपिल देव यांनीही आता आयपीएलचा मुद्दा उपस्थितीत करत चाहत्यांच्या बोलण्यात तथ्य होते, याला दुजोरा दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.