Pakistan World Cup 2024 : पाकिस्तानी कधी सुधारणार ? भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा कोच झाला हतबल, सांगितले ड्रेसिंग रूममधील सत्य

या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत साखळीत आव्हान संपुष्टात आलेल्या पाक संघावर चोहोबाजूने टीका होत आहे. या संघात काहीच अलबेल नाही, तसेच मोठ्या प्रमाणात गटबाजी असल्याचे जाहीर होत असताना आता प्रशिक्षक कर्स्टन यांनीही टीका करत आपली हतबलता बोलून दाखवली.
Gary Kirsten on Pakistan Cricket Team
Gary Kirsten on Pakistan Cricket Teamsakal
Updated on

Gary Kirsten Pakistan Cricket Team : मितभाषी असा स्वभाव असलेले पाकिस्तान संघाचे नवे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनाही पाक संघातील वातावरणावर भाष्य करण्यावरून स्वतःला रोखता आले नाही. विखुरलेला संघ अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत साखळीत आव्हान संपुष्टात आलेल्या पाक संघावर चोहोबाजूने टीका होत आहे. या संघात काहीच अलबेल नाही, तसेच मोठ्या प्रमाणात गटबाजी असल्याचे जाहीर होत असताना आता प्रशिक्षक कर्स्टन यांनीही टीका करत आपली हतबलता बोलून दाखवली.

Gary Kirsten on Pakistan Cricket Team
Suryakumar Yadav Injured : सुपर-8 सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू जखमी; कर्णधार रोहित टेन्शनमध्ये

भारताच्या २०११ मधील विश्वकरंडक विजेत्या संघाचे प्रशिक्षक असलेले कर्स्टन यांनी मे महिन्यात पार पडलेल्या आयपीएलनंतर पाक संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली होती.

पाकचा संघ विश्वकरंडक स्पर्धेस रवाना होण्यापूर्वी कर्स्टन यांनी खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता विश्वकरंडक स्पर्धेतील अनुभवानंतर कर्स्टन यांनी हा एकसंध असलेला संघ नाही. मोठ्या प्रमाणात दुफळी असून गटबाजी आहे. कोणी कोणाला सहाय्य करत नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या असल्याचा सारखा वागतो. मी अनेक संघासोबत राहिलो आहे, पण अशी परिस्थिती पाहिलेली नाही, अशा तीव्र शब्दात कर्स्टन यांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.

Gary Kirsten on Pakistan Cricket Team
WI vs AFG T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजचा विजयी 'चौकार'! शेवटच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानचा लाजिरवाणा पराभव

मुळात स्पर्धेस रवाना होण्यापूर्वीच कर्स्टन यांनी बहुतांशी खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. संघात अनुभवी खेळाडू असूनही त्यांची तंदुरुस्ती जागतिक दर्जापेक्षा फार पाठीमागे आहे, असे ते म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.