T20 WC: "पाकिस्तानात लहान मुलं पण वरूणसारखी बॉलिंग टाकतात"

IND vs PAK: पाकच्या माजी कर्णधाराचं वरूण चक्रवर्तीबद्दल मोठं विधान
Varun-Chakravarthy
Varun-Chakravarthy
Updated on
Summary

IND vs PAK: पाकच्या माजी कर्णधाराचं वरूण चक्रवर्तीबद्दल मोठं विधान

IND vs PAK, T20 World Cup 2021: भारतीय संघाला टी२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारताविरूद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागलं. भारताने विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर कशीबशी १५१ धावांपर्यंत मजल मारली होती. पण पाकिस्तानच्या सलामीवीरांनी १० गडी राखून भारताचा पराभव केला. शाहीन शाह आफ्रिदीने रोहित, राहुल आणि विराटला माघारी धाडत पाकचा विजयाचा मार्ग सोपा केला. सामन्यात भारताला एकही बळी घेता आला नाही. IPL मध्ये यशस्वी ठरलेला वरूण चक्रवर्तीदेखील फारसा यशस्वी ठरला नाही. त्याबद्दल पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने मोठं विधान केलं.

Varun-Chakravarthy
T20 WC: शहजादचा 'सुपरकॅच'! चेंडू पाहताच हवेत घेतली उडी अन्..

पाकिस्तानविरूद्ध रविचंद्रन अश्विनला संघात स्थान न देता युवा वरूण चक्रवर्तीला समाविष्ट करण्यात आले. पण वरूणने ४ षटकात ३३ धावा दिल्या. त्यावरून पाकच्या सलमान बटने एक मोठं विधान केलं. "वरूण चक्रवर्तीची गोलंदाजी इतर खेळाडूंसाठी कदाचित रहस्यमयी असेल. पण आम्ही टेप-बॉलने लहानपणापासून खेळलो आहोत. पाकिस्तानात गल्ली क्रिकेट खेळणारी मुलंदेखील वरूण चक्रवर्तीसारखीच बोटाने चेंडू स्पिन करून गोलंदाजी करतात. म्हणूनच वरूणच्या गोलंदाजीची आम्हाला फारशी अडचण आली नाही", असं तो आपल्या यूट्युब चॅनलवर बोलला.

Varun-Chakravarthy
T20 WC: भारताला हरवलं म्हणून खूप उड्या मारू नका - पाक कर्णधार
India vs Pakistan
India vs PakistanSakal

दरम्यान, पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने मात्र शाहिन आफ्रिदीची तोंडभरून स्तुती केली. "शाहीन शाह आफ्रिदी... अप्रतिम कामगिरी. चित्त्याच्या वेगाने गोलंदाजी करत तू दमदार पराक्रम करून दाखवलास. आफ्रिदीच्या दोन वेगवान गोलंदाजीपुढे भारताचा संघ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. त्याची स्पेल खरंच अप्रतिम होती. भारतीय गोलंदाजांनी आता थोडा विचार करायला हवा. कारण तुम्ही विरोधी संघाचा एकही गडी बाद करू शकलेला नाहीत. अशा वेळी तुम्ही स्वत:ला काय म्हणाल, याचा स्वत:च एकदा विचार करा. सध्याचा पाकिस्तानचा संघ कोणत्याही संघाला पराभवाचं पाणी पाजू शकतो", असा विश्वास पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने यू ट्युबवरील व्हिडीओ दरम्यान व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.