Pat Cummins hat-trick : टी-20 वर्ल्ड कपमध्ये उडाली खळबळ! पॅट कमिन्सने पुन्हा रचला इतिहास; घेतली बॅक टू बॅक 'हॅट्ट्रिक'

Pat Cummins secures back-to-back hat-tricks in T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने टी-20 वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला आहे.
Pat Cummins secures back-to-back hat-tricks in T20 World Cup 2024
Pat Cummins secures back-to-back hat-tricks in T20 World Cup 2024sakal
Updated on

Pat Cummins hat-trick T20 World Cup Aus vs Afg : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने टी-20 वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला आहे. बांगलादेशविरुद्धच्या गेल्या सामन्यात हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम त्याने केला होता आणि पुढच्या सामन्यात पुन्हा तोच पराक्रम केला. अफगाणिस्तानविरुद्धच्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 सामन्यातही त्याने हाच पराक्रम केला होता. विशेष म्हणजे दोन्ही सामन्यांमध्ये त्याने दोन षटकांत हॅट्ट्रिक पूर्ण केली.

Pat Cummins secures back-to-back hat-tricks in T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 : टीम इंडियाच्या विजयाने बदलले उपांत्य फेरीचे समीकरण, 2 संघांवर धोक्याची घंटा

टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील पॅट कमिन्स हा सलग दोन सामन्यांमध्ये हॅट्ट्रिक करणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने 17.6 षटकांत राशिद खानला बाद केले. यानंतर त्याने पुढील षटकात पहिल्या चेंडूवर करीम जन्नतला बाद केले आणि दुसऱ्या चेंडूवर गुलबदिन नायबला आऊट केले.

पॅट कमिन्सने बांगलादेशविरुद्ध सामन्यात पण अशीच हॅटट्रिक घेतली होती. हा पराक्रम एका षटकाच्या सलग तीन चेंडूंवर नाही तर दोन षटकांच्या सलग तीन चेंडूंवर केला होता. त्याने 17.5 मध्ये महमुदुल्लाहला क्लीन बोल्ड केले आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मेहदी हसनला झेलबाद केले. पुढच्या षटकात येताच त्याने पहिल्याच चेंडूवर तौहीद हृदयला बाद करून हॅटट्रिक पूर्ण केली.

Pat Cummins secures back-to-back hat-tricks in T20 World Cup 2024
IND vs BAN T20 WC 2024 : अपराजीत! कुलदीप यादवनं बांगलादेशला नाचवलं; भारताने ग्रुप 1 मध्ये केलं टॉप

टी-20 वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक घेणारे गोलंदाज

1. ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) – बांगलादेश – 2007

2. कर्टिनस कॅम्पर (आयर्लंड) - नेदरलँड्स - 2021

3. वानिंदू हसरंका (श्रीलंका – दक्षिण आफ्रिका) – 2021

4. कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) – इंग्लंड – 2021

5. कार्तिक मयप्पन (UAE) – श्रीलंका – 2022

6. जोशुआ लिटल (आयर्लंड) – न्यूझीलंड – 2022

7. पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) – बांगलादेश – 2024

8. पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) – अफगाणिस्तान – 2024

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.