T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलिया मुद्दाम हरणार? अखेर कर्णधार पॅट कमिन्सनं सांगितलं काय करणार?

Pat Cummins
Pat Cummins AUS vs SCTesakal
Updated on

T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्डकप 2024 मधील ग्रुप B मध्ये इंग्लंडचे सुपर 8 मधील स्थान डळमळीत आहे. वर्ल्डकप विजेत्या इंग्लंडला सामने जिंकूनही ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलँड विरूद्धच्या सामन्याच्या निकालावर अवलंबून रहावं लागणार आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉश हेजलवूडने ऑस्ट्रेलिया इंग्लंडला वर्ल्डकपमधून बाहेर काढण्यासाठी सामन्याचा निर्णय मॅनिप्युलेट करू शकते असे संकेत दिले होते. त्यावरून बरचं वादंग निर्माण झालं होतं. यावर आता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने देखील आपलं मत व्यक्त केलं आहे.

Pat Cummins
IND vs CAN Pitch Report: न्यूयॉर्कच्या खेळपट्टीचं भूत मानगुटीवरून उतरलं आता फ्लोरिडाचं आव्हान; पिच देणार का फलंदाजांना दिलासा

पत्रकारांशी बोलताना कमिन्स म्हणाला की, 'मला असं वाटतं की ज्यावेळी तुम्ही मैदानावर उतरता त्यावेळी तुम्ही तुमचे सर्वस्व पणाला लावून खेळता. जर तुम्ही तसं करत नसाल तर ते खेळ भावनेच्या आणि स्पिरीट ऑफ क्रिकेटच्या विरूद्ध असतं. आम्ही नेट रनरेटवर प्रभाव पाडण्याबाबत खूप खोलात जाऊन विचार करत नाहीये.'

कमिन्स हेजलवूडच्या वक्तव्यावर देखील म्हणाला की, 'मी जॉश हेजलवूडशी बोललो आहे. त्याने ते वक्तव्य विनोदाने केले होते. त्याच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. आम्ही जाऊन फक्त स्कॉटलँडविरूद्ध खेळणार आहोत. स्कॉटलँडसाठी यंदाचा टी 20 वर्ल्डकप खूप चांगला गेला आहे. त्यांच्याविरूद्धचा सामना हा अटीतटीचा असेल.'

'नक्कीत नेट रनरेटला सध्या महत्व आलं आहे. त्याची चर्चा देखील होईल. मात्र यामुळं आम्ही आमची खेळाची शैली बदलणार का तर कदापी नाही. आम्ही सामना जिंकण्यासाठी आणि आक्रमक खेळण्याच्या मानसिकतेनेच मैदानात उतरतो. यावेळी देखील आम्ही नेहमीच्याच मानसिकतेने मैदानात उतरणार आहोत.

Pat Cummins
Shakib Al Hasan: कोण, सेहवाग? भारतीय दिग्गजाने केलेल्या टीकेवर शाकिबचं प्रत्युत्तर, वाचा नेमकं काय म्हणाला

जरी ऑस्ट्रेलिया शेवटच्या सामन्यात कशी खेळणार याची चर्चा होत असली तरी नेट रनरेटचा विषय इंग्लंडनेच संपवला आहे. त्यांनी ओमानविरूद्धच्या सामन्यात 8 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवत आपलं नेट रनरेट वाढवलं आहे. त्यांचे नेट रनरेट हे 3.08 इतके असून स्कॉटलँडचे नेट रनरेट हे 2.16 इतके आहे.

जर इंग्लंडने नामिबियाला पराभूत केलं आणि ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँडला मात दिली तर इंग्लंड सुपर 8 मध्ये पोहचू शकतो. जर स्कॉटलँडने ऑस्ट्रेलियाला मात दिली तर इंग्लंडला मात्र आपली बॅग पॅक करून घर गाठावं लागणार आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.