Rahul Dravid : पुढच्या आठवड्यात मी बेरोजगार होणार... टी 20 वर्ल्डकप जिंकल्यावर राहुल द्रविड हे काय बोलला?

T20 World Cup 2024 : राहुल द्रविडची ही भारतीय संघाचा कोच म्हणून शेवटची स्पर्धा होती. यानंतर राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच असणार नाही.
Rahul Dravid
Rahul Dravid T20 World Cup 2024esakal

Rahul Dravid T20 World Cup 2024 : भारताच्या टी 20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकल्याबद्दल मला खूप अभिमान असल्याचं सांगितले. राहुल द्रविडच्या नावावर यापूर्वी कधीही वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग लागला नव्हता. मात्र प्रशिक्षक म्हणून आता त्याच्या नावावर टी 20 वर्ल्डकपचे विजेतेपद असणार आहे.

Rahul Dravid
Team India Prize Money: मोठी बातमी! BCCI ने T20 वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघासाठी केली तब्बल 125 कोटींच्या बक्षीसाची घोषणा

दरम्यान, पीटीआयशी बोलताना द्रविड म्हणाला की, 'गेल्या काही तासांपासून माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द कमी पडत आहेत. मला या संघाचा खूप अभिमान आहे. ते अवघड परिस्थितीत देखील झुंजारपणा दाखवत लढले. आजचा सामना देखील खूप परीक्षा पाहणारा होता. संघाने पहिल्या सहा षटकातच तीन विकेट्स गमावल्या होत्या. आम्ही अवघड परिस्थितीत पोहचलो होतो. मात्र संघानं शेवपर्यंत फाईट दिली, आपला विश्वास ढळू दिला नाही.'

राहुल द्रविडने भारतीय संघ इथून पुढे देखील आपली दमदार कामगिरी सुरू ठेवेल असा विश्वास व्यक्त केला. तो म्हणाला की, 'या संघातील क्षमता आणि गुणवत्ता जबरदस्त आहे. एक क्षण असं वाटलं की सगळा जोर लावूनही आपण ही ट्रॉफी जिंकू शतक नाही. मात्र आज मी विश्वासानं सांगू शकतो की हा संघ त्यांची चांगली कामगिरी पुढे देखील सुरू ठेवेल अन् अनेक ट्रॉफी जिंकेल.'

Rahul Dravid
T20 World Cup 2024: विराट नाही तर 'हा' असेल रोहितचा जोडीदार; अशी असेल टी 20 वर्ल्डकप 2024 ची बेस्ट प्लेईंग 11

राहुलने आपली मुलाखत एका हास्यविनोद करत संपवली. तो म्हणाला, 'मी या विजयी जल्लोषाच्या वातावरणातून लवकरच बाहेर पडणार आहे. कारण मी पुढच्या आठवड्यात बेरोजगार असणार आहे. मी फार पुढचा विचार करत नाहीये. मात्र आशा आहे की मी यातून बाहेर येईन. मला वाटतं आयुष्य म्हणजे हे असच असतं.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com