Rahul Dravid : रोहितने 'तो' फोन कॉल केला नसता तर.... द्रविड कर्णधारासोबतच्या नात्याबद्दल काय म्हणाला?

T20 World Cup 2024 : राहुल द्रविडने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील आपल्या शेवटच्या भाषणात अनेक भावनिक मुद्द्यांना हात घातला. त्यानं रोहित शर्माचे विशेष आभार मानले.
Rahul Dravid
Rahul Dravid Rohit Sharma Phone Callesakal

Rahul Dravid Rohit Sharma Phone Call : भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर एखाद्या लहान मुलासारखे सेलिब्रेशन केलं होतं. त्याचं हे सेलिब्रेशन पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. द्रविड आपल्या भावाना अशा खुल्या प्रकारे व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. मात्र टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतरचे हे सेलिब्रेशन खूप खास होतं.

राहुल द्रविडने खेळाडू म्हणून तीन वर्ल्डकप गमावले होते. त्यानंतर त्याने भारतीय संघाचे प्रशिक्षक पद स्विकारल्यापासून भारताने तिसऱ्यांना आयसीसीच्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. सहाव्या प्रयत्नात राहुल द्रविडला ती वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावण्याची संधी मिळाली. दरम्यान, भारतीय संघाची प्रशिक्षक पदाची दुसरी टर्म कशी मिळाली हे राहुल द्रविडने सांगितले.

Rahul Dravid
IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल; BCCI ने ज्याच्यावर बंदी घातलेली, त्यालाच दिली संधी

भारताने वनडे वर्ल्डकपची फायनल गमावल्यानंतर राहुल द्रविड भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची दुसरी टर्म मिळावी यासाठी फारसा उत्सुक नव्हता. नोव्हेंबर महिन्यात त्याचा कार्यकाळ पूर्ण होणार होता. तो निराश होता. मात्र रोहित शर्माच्या एका फोन कॉलने सर्व चित्र बदललं.

राहुल द्रविडने भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आपले शेवटचे भाषण दिले. बीसीसीआयने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. राहुल द्रविड या व्हिडिओत म्हणतो, 'रो (रोहित शर्मा) तू नोव्हेंबर महिन्यात तो फोन कॉल केलास अन् मला प्रशिक्षक पदी कायम राहण्याची विनंती केलीस त्याबद्दल मी तुझा आभारी आहे.'

'तुम्हा सर्वांसोबत काम करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. रोहितसोबत देखील काम करताना मजा आली. तू दिलेल्या वेळेबद्दल तुझे आभार. मला माहिती आहे की कोच आणि कॅप्टन म्हणून आपण दोघांनी एकमेकांसोबत खूप वेळ घालवला. आपण काही गोष्टींवर सहमती दर्शवली, काही गोष्टींवर असहमती दर्शवली. एकमेकांना जाणूण घेणं खूप छान होतं.'

Rahul Dravid
Harmanpreet Kaur: भारतीय महिलांचा कसोटीत मोठा पराक्रम! हरमनप्रीत असा कारनामा करणारी बनली पहिलीच कर्णधार

रोहित - राहुलची हिट जोडी

रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्या जोडीने भारतीय क्रिकेटला अनेक आनंदाचे क्षण दिले आहे. या दोघांचा प्रवास जबरदस्त होता. गेल्या दोन वर्ल्डकपमध्ये भारताचे जिंकण्याचे रेकॉर्ड हे दमदार होते. भारताने 20 वर्ल्डकप सामन्यात 18 विजय मिळवले आहेत.

भारताने फक्त वनडे वर्ल्डकपची फायनल गमावली. टी 20 वर्ल्डकपमध्ये एक सामना वॉश आऊट झाला. वर्ल्डकपमध्ये असे रेकॉर्ड ही भारतीय क्रिकेटसाठी एक गौरवाची बाब आहे. याचबरोबर भारताने गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल देखील गाठली होती. यावरून भारताचा तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये असलेला दबदबा सिद्ध होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com