Rahul Dravid: 'ते माझ्या तत्वांच्या विरुद्ध, प्लीज हे थांबवा...', फायनलपूर्वी द्रविडची विनंती

T20 World Cup Final: टी२० वर्ल्ड कप २०२४ अंतिम सामन्यापूर्वी राहुल द्रविडने चाहत्यांना खास विनंती केली आहे.
Rahul Dravid
Rahul DravidSakal

T20 World Cup 2024, India vs South Africa: टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम लढतीमध्ये भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असणार आहे. सोबतच सध्याचे टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविडचादेखील कार्यकाळ संपणार आहे.

त्यामुळेच क्रिकेटप्रेमींना कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकताना पाहण्याची इच्छा तर आहेच, पण हे विजेतेपद प्रशिक्षक द्रविड यांच्यासाठीही आठवणीतला राहावा.

यासाठीच क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर एक कॅम्पेन्स चालवली आहे. परंतु राहुल द्रविडने मात्र यावर नाराजी दर्शवली आहे.

Rahul Dravid
T20 World Cup Final: टी-20 वर्ल्ड कप फायनल मॅच पाहताना हेल्दी अन् चवदार स्नॅक्सचा घ्या आस्वाद

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ भारतात खेळवल्या गेलेल्या २०२३च्या वनडे वर्ल्डकप नंतर वाढवला गेला होता. ह्या टी-२० वर्ल्डकप नंतर त्यांचा कार्यकाळ संपणार आहे.

द्रविड म्हणाला, “हे पूर्णपणे माझ्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. एखाद्यासाठी ट्रॉफी जिंकण्यासारख्या गोष्टींवर माझा विश्वास नाही."

"मला आठवते की कोणीतरी सांगितले होते की, तुम्हाला एव्हरेस्ट का चढायचे आहे, असे विचारल्यावर उत्तर मिळाले की, ‘मला एव्हरेस्टवर चढायचे आहे कारण ते तिथे आहे’. मग हा विश्वचषक का जिंकायचा, कारण तो घडत आहे. हे कोणा व्यक्तीसाठी जिंकायचे नसते किंवा ते कोणाच्याही फायद्यासाठी मिळवायचे नसते."

Rahul Dravid
T20 World Cup 2024: ऑलराऊंडरची ताकद ते सांघिक कामगिरी... 'या' 3 कारणांमुळे टीम इंडिया जिंकू शकते वर्ल्ड कप

तो पुढे म्हणाला, “आम्ही येथे ही ट्रॉफी जिंकण्यासाठी आलो आहोत आणि आम्हाला हा विश्वचषक जिंकायचा आहे, यासाठी चांगले क्रिकेट खेळावे लागेल."

"ही ट्रॉफी एका व्यक्तीसाठी जिंकली पाहिजे, मी याच्या विरोधात आहे. मी ज्या प्रकारची व्यक्ती आहे हे पूर्णपणे त्याच्या विरुद्ध आहे आणि सोबतच माझ्या तत्वांविरुद्ध आहे, त्यामुळे मला काय बोलावे ते समजत नाही. मला त्याबद्दल बोलायचेही नाही. "

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील अंतिम सामना शनिवारी (२९ जून) बार्बाडोसला रंगणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com