Rahul Dravid : 'खेळाडू म्हणून मी जिंकू शकलो नाही, पण...', टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर राहुल द्रविड झाला भावूक

राहुल द्रविडच्या कार्यकाळात टीम इंडियाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2022 टी-20 वर्ल्ड कप उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
Rahul Dravid Emotional After Winning T20 World Cup 2024
Rahul Dravid Emotional After Winning T20 World Cup 2024sakal
Updated on

Rahul Dravid Emotional After Winning T20 World Cup 2024 : राहुल द्रविड सप्टेंबर 2021 मध्ये भारतीय संघात सामील झाला. त्याने भारतीय अंडर-19 संघाचे नेतृत्व करून वर्ल्ड कप जिंकला होता आणि भारत अ संघासोबत खूप मेहनत घेतली होती. त्यामुळे तो संघात आल्यावर त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या.

त्याच्या कार्यकाळात टीम इंडियाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2022 टी-20 वर्ल्ड कप उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर त्याने रोहितसोबत असा संघ तयार करण्याचे ठरवले ज्याला हरवणे कठीण जाईल. यासाठी त्यांनी 3 वर्षे मेहनत घेतली. बार्बाडोसमध्ये जेव्हा या मेहनतीचे फळ मिळाले तेव्हा द्रविड खूप भावूक झाला.

Rahul Dravid Emotional After Winning T20 World Cup 2024
Sachin Tendulkar : मित्रा वर्तुळ पूर्ण झालं...! वर्ल्ड कप जिंकल्यावर क्रिकेटच्या देवाचा राहुल द्रविडसाठी भावूक मेसेज

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. बार्बाडोस येथे झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. यासह भारताने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. मुख्य कोच म्हणून राहुल द्रविडचा हा शेवटचा सामना होता आणि त्यानंतर त्याने भारतीय संघाचा निरोप घेतला.

Rahul Dravid Emotional After Winning T20 World Cup 2024
Hardik Pandya : 'आपण त्यांना मिस करू, पण...' रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याचे मोठे वक्तव्य

वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड खूपच भावूक दिसला. प्रसारमाध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, एक खेळाडू म्हणून मी वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याइतके भाग्यवान नव्हतो पण मी माझे सर्वोत्तम दिले. आता भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवण्याची संधी मिळाली. मी खूप भाग्यवान होतो की या खेळाडूंनी माझ्यासाठी हे केले आणि वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. ही एक मोठी भावना आहे. वर्ल्ड कप जिंकून मला माझ्या अडचणी दूर करायच्या होत्या असे नाही, तर मी माझे कर्तव्य बजावत होतो. हा खूप छान प्रवास होता. सपोर्ट स्टाफ आणि संपूर्ण कोचिंग स्टाफने मिळून उत्तम काम केले.

राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ आता संपुष्टात आला आहे. त्याचा करार फक्त टी-20 वर्ल्ड कप 2024 पर्यंत होता. राहुल द्रविडला 2007 मध्येच वेस्ट इंडिजमध्ये त्याच्या नेतृत्वाखालील वर्ल्ड कपच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडावे लागले होते. मात्र, 17 वर्षांनंतर त्याच मातीत प्रशिक्षक म्हणून त्यांनी वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()