Rashid Khan : लारा अफगाणिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचवणारे एकमेव व्यक्ती... राशिद असं का म्हणाला?

T20 World Cup 2024 : राशिद खानने सामना झाल्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानं बांगलादेशविरूद्धच्या विजयाचे कारण देखील सांगितले.
Rashid Khan
Rashid Khan Afghanistan Vs Bangladeshesakal
Updated on

Rashid Khan Afghanistan Vs Bangladesh : टी 20 वर्ल्डकप 2024 च्या सुपर 8 मधील अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा 8 धवांनी पराभव करत सेमी फायनल गाठली. अफगाणिस्तानने टी 20 वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच सेमी फायनल गाठली आहे. अफगाणिस्तानने सामना जिंकल्याने ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास झाला आहे.

दरम्यान, फक्त 115 धावा डिफेंड करणाऱ्या अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने सामना झाल्यावर भावनिक प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'सेमी फायनलमध्ये पोहचणे हे एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. आम्ही स्पर्धेची सुरूवात कशी केली याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून होत्या. आमचा विश्वास न्यूझीलंडला हरवल्यानंतर वाढला.'

Rashid Khan
AFG vs BAN : ऑस्ट्रेलियाचा केला करेक्ट कार्यक्रम; बांगलादेशचा पराभव करत अफगाणिस्तानने रचला इतिहास

'माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. आम्हाला सेमी फायनलमध्ये पोहचवणारे एकमेव व्यक्ती हे ब्रायन लारा आहेत. आम्ही त्यांचे शब्द खरे करून दाखवले. मी त्यानां सांगितले होते की आम्ही तुम्हाला निराश करणार नाही.'

सामन्याबद्दल बोलताना राशिद खान म्हणाला की, 'या खेळपट्टीवर 130 ते 135 धावा चांगली टोटल ठरली असती. आम्ही 15 ते 20 धावा कमी केल्या. मात्र आमची मानसिकता सकारात्मक होती.

Rashid Khan
Rohit Sharma : ऑस्ट्रेलियानं प्लॅन बदलला, मी ऑफ साईड.... रोहितनं सांगितलं मार्शची रणनिती कशी केली फेल

आम्हाला माहिती होतं की त्या 12 षटकात आम्हाला कोणत्या दिव्यातून जावं लागलं होतं. इथंच आम्ही सामन्यावर नियंत्रण मिळवलं. आमची योजना स्पष्ट होती. आम्ही त्या दृष्टीने कष्ट घेतले जे आमच्या हातात होतं ते केलं. प्रत्येकानं चांगली कामगिरी केली.

टी 20 मध्ये आमच्याकडे चांगला संघ आहे. चांगले गोलंदाज आहेत. दर्जेदार वेगवान गोलंदाजी आहे. ते कौशल्यपूर्ण गोलंदाजी करतात. जरी पाऊस येत जात होता तरी आम्ही मानसिकदृष्ट्या मैदानातच होतो. आम्हाला त्यांच्या 10 विकेट्स घ्यायच्या होत्या.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com