Ravichandran Ashwin : अफगाणिस्तानच्या विजयानं पाकच्या पोटात दुखलं... पत्रकारानं भारताला मधी ओढलं, अश्विननं थेट मस्कलाच केलं टॅग

T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियााच पराभव करत टी 20 वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर केला.
Ravichandran Ashwin
Ravichandran Ashwin esakal
Updated on

Ravichandran Ashwin Tweeter : अफगाणिस्तानने यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकदा मोठा उलटफेर केला. त्यांनी वनडे वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मोठा इतिहास रचला. टी 20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

त्यानंतर सोशल मीडियावर अफगाणिस्तानच्या क्रिकेटबाबत अनेक पोस्ट पडू लागल्या. क्रिकेट जगताने अफगाणिस्तानचे तोंडभरून कौतुक केलं. दरम्यान, अफगाणिस्तानचा विजय पाकिस्तानच्या पत्रकाराच्या पचनी पडला नाही. त्याने एक वादग्रस्त ट्विट करून त्यात भारताला देखील खेचलं. यानंतर भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने यावर प्रतिक्रिया दिली.

Ravichandran Ashwin
T20 World Cup: नवा ट्विस्ट! ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान जाणार बाहेर, तर बांगलादेश मारणार सेमीफायनलमध्ये एन्ट्री? जाणून घ्या गणित

पाकिस्तानचा पत्रकाराने ट्विटवर पोस्ट करत म्हणाला की, अफगाणिस्तान भारताला सोडून जगातील कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. भारताला का नाही तर त्यांना बीसीसीआयकडून आयपीएल करार मिळतात.

याच्या प्रत्युत्तरात अश्विनने देखील ट्विट केलं. त्यानं आपल्या ट्विटमध्ये थेट एलॉन मस्कला टॅग केल. अश्विन लिहितो, 'एलॉन मस्क मी तुला काय करायचं हे सांगू शकत नाही. मात्र माझ्या घरात कोणी प्रवेश करायचा हे ठरवण्याचा अधिकार नक्कीच मला आहे. माझी टाईमलाईन माझा निर्णय.'

अश्विनच्या या ट्विटवर एकाने सल्ला दिला की तू अशा लोकांना ब्लॉक करू शकतोस. त्यावर अश्विनने उत्तर दिलं की प्रत्येक दिवशी हँडेल्स ब्लॉक करणं हे माझं काम नाही. मला माहिती आहे की कोणाला फॉलो करायचं आहे.'

Ravichandran Ashwin
T20 World Cup 2024: भारताविरुद्ध जिंकली तरी ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कपमधून जाणार बाहेर? समीकरण आले समोर

यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांचा पराभव केला आहे. आता अफगाणिस्तानचा पुढचा सामना हा बांगलादेशविरूद्ध होणार आहे. जर त्यांनी हा सामना जिंकला अन् भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर अफगाणिस्तान सेमी फायनलमध्ये जाणार आहे.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.