Rohit, Virat, Jadeja Retirement: वर्ल्ड कप जिंकताच टीम इंडियात निर्माण झाली पोकळी! रोहित, विराट अन् जडेजाची जागा घेणार कोण?

T20 World Cup 2024: भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यानंतर रविंद्र जडेजानेही निवृत्ती घेतली. त्यामुळे भारतीय संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
Virat Kohli, Ravindra Jadeja, Rohit Sharma
Virat Kohli, Ravindra Jadeja, Rohit SharmaSakal

Rohit Sharma, Virat Kohli, Ravindra Jadeja T20I Retirement: २९ जून २०२४... ही तारीख भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात कायमस्वरुपासाठी राहिल. कारण या दिवशी भारतीय संघाने केवळ दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपच जिंकला नाही, तर याच दिवशी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटचा तीन दिग्गजांनी निरोप घेतला.

भारतीय संघाने २९ जून रोजी टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारताने टी२० वर्ल्ड कपला गवसणी घातली.

पण या विजयानंतर आधी स्टार फलंदाज विराट कोहली, मग कर्णधार रोहित शर्मा आणि दुसऱ्या दिवशी अष्टपैलू रविंद्र जडेजा यांनी एक एक करत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Virat Kohli, Ravindra Jadeja, Rohit Sharma
Virat Kohli T20i Retirement : वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच विराट कोहलीने का घेतली निवृत्ती? जाणून घ्या 'त्या' मागील मोठे कारणे

त्यामुळे आता एकाचवेळी भारताच्या टी२० संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या तिघांनीही पुढच्या पिढीला बॅटन सोपवलं आहे. यापूर्वीही या तिघांशिवाय भारतीय संघ काही टी२० सामने खेळला आहे. मात्र असं असलं तरी मोठ्या स्पर्धेत अद्याप या तिघांव्यतिरिक्त कधीही भारतीय संघ उतरलेला नाही.

त्यामुळे आता रोहित, विराट आणि जडेजा या तिघांची पोकळी एकाचवेळी भरून काढण्याचं काम भारताच्या नव्या संघव्यवस्थापनेला करावं लागणार आहे. कारण आता या टी२० वर्ल्ड कपसह भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडसह सपोर्ट स्टाफमधील अन्य प्रशिक्षकांचेही कार्यकाळ संपले असून आता बीसीसीआय लवकरच नव्या प्रशिक्षकांचीही घोषणा करणार आहे.

अशात या नव्या प्रशिक्षकांसमोर नवा टी२० संघ मोठ्या स्पर्धांसाठी तयार करण्याचंही आव्हान असणार आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू आहेत, तर रविंद्र जडेजाचं फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील योगदान अमुल्य राहिलेलं आहे.

Virat Kohli, Ravindra Jadeja, Rohit Sharma
Rohit Sharma Retirement: विराटपाठोपाठ रोहित शर्माचाही T20I क्रिकेटला अलविदा! वर्ल्ड कप जिंकत केली निवृत्तीची घोषणा

भारताकडे पर्याय कोणते?

दरम्यान, विराट, रोहित, जडेजाची पोकळी भरून काढणं कठीण जरी असलं, तरी सध्या भारतात अनेक युवा खेळाडू आहेत, जे त्यांत्यासाठी पर्याय ठरू शकतात.

यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, नितीश रेड्डी, अभिषेक शर्मा, ईशान किशन, पडिक्कल, अशा अनेक खेळाडूंना टी२० मध्ये संधी दिली जात आहे. त्यामुळे आता अशा अनेक खेळाडूंवर भारताच्या भविष्याची भिस्त राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com