David Warner: वॉर्नरने निवृत्ती घेताच रिकी पाँटिंगचा ऑस्ट्रेलियाला इशारा, म्हणाला, 'आता अवघड आहे की...'

David Warner Retirement: डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून याबद्दल रिकी पाँटिंगनेही आपले मत व्यक्त केले आहे.
David Warner | Ricky Ponting
David Warner | Ricky PontingSakal

Ricky Ponting on David Warner Retirement: ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील आपल्या संघाचे आव्हान संपल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली. वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अशाच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनेही वॉर्नरच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की वॉर्नरसारखा खेळाडू शोधणे अवघड जाणार आहे.

वॉर्नर या वर्षाच्या सुरुवातीलाच वॉर्नर वनडे आणि कसोटी या प्रकारांमधून निवृत्त झाला होता. आता त्याने आंतरराष्ट्रीय टी20मधून निवृत्ती घेतली. वॉर्नरची तब्बल 15 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द राहिली. या 15 वर्षांत त्याने ऑस्ट्रेलियाला अनेक मोठे विजय मिळवून दिले.

David Warner | Ricky Ponting
T20 World Cup 2024 : सेमीफायनल सामन्याच्या 1 दिवसआधी कर्णधार टेन्शनमध्ये! स्टार फलंदाज झाला जखमी

दरम्यान, वॉर्नरने टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताविरुद्ध अखेरचा सामना खेळला, ज्याच ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यावेळी पाँटिंगही समालोचन करत होता. त्याने सामन्यानंतर वॉर्नरची भेटही घेतली.

वॉर्नरच्या निवृत्तीबद्दल आयसीसीशी बोलताना पाँटिंग म्हणाला, 'मी माझा हात त्याच्या गळ्यात टाकला आणि त्याला म्हणालो, आजच्या सामन्यानंतर एकांतात शांत बस आणि ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही प्रकारात तुझी किती शानदार कारकिर्द राहिली, याचा विचार कर. '

'आपल्याला माहित आहे, तो कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्त झाला आहे, पण डेव्हिड वॉर्नरचा जो प्रभाव ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात होता, तसा खेळाडू शोधण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल.'

David Warner | Ricky Ponting
T20 World Cup: आता रंगणार सेमीफायनलचा थरार! कोणाची गाठ कोणाशी, जाणून घ्या शेड्युल

पाँटिंग पुढे म्हणाला, 'मी त्याच्याबरोबर खेळलो आहे, मी त्याला आयपीएलमध्ये गेल्या काही वर्षात प्रशिक्षण दिलं आहे आणि मला त्याची साथ छान वाटते. त्यामुळे त्याने जे केलं, त्याबद्दल अभिमान बाळगला पाहिजे.'

वॉर्नर गेल्या काही वर्षापासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघांकडून खेळला आहे. या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद रिकी पाँटिंगकडे आहे.

दरम्यान, वॉर्नरच्या कारकि‍र्दीबद्दल सांगायचे झाले, तर त्याने 112 कसोटी सामने खेळताना 44.59 च्या सरासरीने 26 शतके आणि 37 अर्धशतकांसह 8786 धावा केल्या आहेत.

तसेच वनडेत वॉर्नरने 161 सामने खेळले असून 45.30 च्या सरासरीने 22 शतके आणि 33 अर्धशतकांसह 6932 धावा केल्या, तर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये त्याने 110 सामन्यांत 33.43 च्या सरासरीने 1 शतक आणि 28 अर्धशतकांसह 3277 धावा केल्या.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com