T20 World Cup 2024: ऋषभ पंतला Playing-11मध्ये जागा मिळाल्यास 'या' दोन खेळाडूंचा पत्ता कट; जाणून घ्या टीम कॉम्बिनेशन

Indian Team Playing XI For T20 World Cup: सध्या टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या तयारीत टीम इंडिया व्यस्त आहे.
T20 World Cup 2024 Team India Playing-11
T20 World Cup 2024 Team India Playing-11ेोकोत
Updated on

T20 World Cup 2024 Team India Playing-11: सध्या टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या तयारीत टीम इंडिया व्यस्त आहे. खेळाडूंनी बुधवारी सराव केला, त्याचा व्हिडिओही समोर आला. काही खेळाडू वगळता सर्व खेळाडू वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला पोहोचले आहेत. यावेळी निवड समितीने निवडलेल्या पंधरा सदस्यीय खेळाडूंमध्ये ऋषभ पंतचे नावही आहे. मात्र, ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले तर संजू सॅमसन आणि शिवम दुबे या दोन बड्या खेळाडूंना बाहेर बसावे लागू शकते.

T20 World Cup 2024 Team India Playing-11
T2O World Cup 2024 : अमेरिकेत वादळी पावसात अडकले कर्णधार रोहित अन् कोच द्रविड...; 'तो' व्हिडिओ आला समोर

ऋषभ पंतबद्दल बोलायचे झाले तर, अपघातामुळे तो बराच काळ क्रिकेटच्या मैदानातून बाहेर होता. मात्र, पंत आयपीएल 2024 दरम्यान मैदानात परतला आहे. त्याने या हंगामात त्याच्या जुन्या शैलीत फलंदाजीही केली. त्याच्याकडे पाहून असे वाटले नाही की तो इतके दिवस मैदानाबाहेर होता. याच कारणामुळे ऋषभ पंतची टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली.

T20 World Cup 2024 Team India Playing-11
India Head Coach : गौतम गंभीर नाही तर.... MS धोनी होणार भारताचा मुख्य कोच? कोहलीच्या जवळच्या व्यक्तीने केलं मोठं वक्तव्य

पंतशिवाय संजू सॅमसनचीही टीम इंडियात यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड झाली आहे. मात्र, ऋषभ पंतचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश झाल्यास संजू सॅमसनला बाहेर बसवल्या जाईल हे निश्चित आहे. संघ व्यवस्थापन संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांच्यातील एकाच खेळाडूला संधी देणार आहे. अशा परिस्थितीत पंतने चांगली कामगिरी केली तर संजू सॅमसनला अनेक सामन्यांतून बाहेर बसावे लागू शकते.

संजू सॅमसनशिवाय युवा अष्टपैलू शिवम दुबेही बाहेर जाऊ शकतो, कारण टीम इंडियाकडे पंतच्या रूपाने डावखुरा फलंदाजाचा पर्याय असेल. एकूणच, ऋषभ पंत खेळला तर संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे फार कठीण आहे.

T20 World Cup 2024 Team India Playing-11
ICC T20 Team Ranking : टी-20 वर्ल्ड कपआधी ICCची मोठी घोषणा! क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्थानावर कायम

ऋषभ पंतला Playing-11 मध्ये जागा मिळाल्यास हा असेल भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.