Rishabh Pant: धोनी, विराट अन् रोहित एकत्र लागले नाचायला, पंत रिल शेअर करत म्हणाला,'सॉरी भैय्या लोगो को...'; पाहा Video

Rishabh Pant Shares Funny Reel: ऋषभ पंतने एक रिल शेअर केले आहे, ज्यात धोनी, विराट आणि रोहित एकत्र नाचताना दिसत आहे.
Rishabh Pant Shares Funny Reel
Rishabh Pant Shares Funny ReelSakal

Rishabh Pant Shares Funny Reel: टी20 वर्ल्ड कप 2024 मधील सुपर-8 फेरीत भारतीय संघाने बांगलादेशला 50 धावांनी पराभूत केले. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत पोहण्यासाठी प्रबळ दावेदारी ठोकली आहे. दरम्यान, या विजयानंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने एक मजेशीर रिल शेअर केला आहे, ज्याबद्दल सध्या जोरदार चर्चा आहे.

पंतने इंस्टाग्रामवर जे रिल शेअर केले आहे, ती एक मीम पोस्टआहे. हे रिल त्याने बनवलेले नसल्याचे त्याने स्पष्ट केले असून ते त्याच्या इंस्टाग्राम फीडला आले होते, जे त्याने शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये दिसले की माजी कर्णधार एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा नाचत आहेत. या रिलला 'बरसो रे' हे गाणे बॅकग्राऊंडला वाजत आहे.

Rishabh Pant Shares Funny Reel
T20 World Cup: अन् तिथेच इंग्लंडने मॅच गमावली, पाहा द. आफ्रिकेच्या कर्णधाराने मागे पळत येत पकडलेला अविश्वसनीय कॅच

हे रिल शेअर करत पंतने कॅप्शनमध्ये विराट, रोहित आणि धोनी यांना प्रेमाने भैय्या म्हणत त्यांची माफीही मागितली आहे. पंतने लिहिले की 'चांगला विजय. सॉरी सारे भैय्या लोकांना. पण हा शानदार व्हिडिओ मला पोस्ट करावाच लागला. ज्याने कोणी हे बनवलं त्याचे आभार, माझे पहिले स्क्रिन रेकॉर्डिंग.' या रिलवर युजर्सच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताने 20 षटकात 5 बाद 196 धावा केल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 50 धावांची नाबाद खेळी केली. तसेच विराट कोहली (37), ऋषभ पंत (36), शिवम दुबे (34) आणि रोहित शर्मा (23) यांनीही छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या.

बांगलादेशकडून तान्झिम हसन साकिब आणि रिषाद हुसैन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच शाकिब अल हसनने 1 विकेट घेतली.

Rishabh Pant Shares Funny Reel
T20 World Cup: डी कॉक आऊट होता की नॉट आऊट? मार्क वूडने घेतलेल्या त्या कॅचमुळे चर्चेला उधाण

त्यानंतर 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला 20 षटकात 8 बाद 146 धावाच करता आल्या. बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हुसैन शांतोने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तसेच तान्झिद हसनने 29, तर रिषाद हुसैनने 24 धावा केल्या. यांच्याशिवाय कोणालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.

भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पांड्याने 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com