Rishabh Pant Video: स्वत:च्या पायावरही उभं राहता येत नव्हतं, आता जिंकलाय वर्ल्ड कप; पंतने दाखवली 18 महिन्यांच्या प्रवासाची झलक

T20 World Cup 2024: अपघातानंतर टी20 वर्ल्ड कप जिंकण्यापर्यंतच्या प्रवासाची झलक दाखवणारा व्हिडिओ ऋषभ पंतने शेअर केला असून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
Rishabh Pant
Rishabh PantSakal
Updated on

Rishabh Pant News: भारतीय संघाने नुकतेच टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं. शनिवारी (29 जून) बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या वर्ल्ड कप विजेत्या संघात यष्टीरक्षक ऋषभ पंतचाही सहभाग होता.

दरम्यान, 18 महिन्यांपूर्वी पंत हा वर्ल्ड कप खेळू शकेल की नाही, यावरही प्रश्नचिन्ह होते. मात्र, त्याने केलेल्या मेहनतीनंतर आज तो विश्वविजेता खेळाडू झाला आहे. दरम्यान, त्याने आता या 18 महिन्यातील प्रवासाची एक झलक दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियाला शेअर केला आहे.

Rishabh Pant
Virat Kohli: 'विराटला गोलंदाजांनी वाचवलं, सामनावीर तो नव्हे...' T20 वर्ल्ड कप फायनलनंतर मांजरेकर कडाडले

खरंतर 18 महिन्यांपूर्वी डिसेंबर 2022 च्या अखेरीस पंतचा गंभीर कार अपघात झाला होता. या अपघातात तो मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता. त्याच्या गुडघ्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे त्याला बरेच दिवस स्वत:च्या पायावरही उभं राहता येत नव्हतं. त्याला आधाराची गरज भासत होती.

मात्र, त्याने कुटुंब, मेडिकल टीम, ट्रेनिंग टीमच्या मदतीने मेहनत घेत क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केलं. तो बरेच दिवस राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) त्याच्या दुखापतीवर काम करत होता. अखेरच त्याने आयपीएल 2024 मधून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्यानंतर त्याने टी20 वर्ल्ड कपसाठी भारताच्या संघातही स्थान मिळवलं.

Rishabh Pant
T20 World Champions To Return Home : विश्‍वविजेत्या भारतीय संघाचे आज आगमन; चाहते स्वागतासाठी सज्ज

दरम्यान, या प्रवासाचा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की 'मी नम्र, कृतज्ञ आहे. ईश्वराच्या स्वत:च्या योजना असतात.'

ऋषभ पंतने टी20 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली. त्याने फलंदाजी करताना अनेक छोट्या पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. याशिवाय त्याने यष्टीरक्षणातही महत्त्वाची कामगिरी केली होती. त्याने 8 सामन्यांत 171 धावा केल्या. तसेच त्याने या स्पर्धेत यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक 14 बळी घेतले.

Pratima olkha:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com