Rohit Sharma : शाहीनला पहिल्याच षटकात षटकार मारत रोहितनं इतिहास रचला! मात्र डावखुऱ्या आफ्रिदीने घेतला बदला

Rohit Sharma
Rohit Sharma IND vs PAK ESAKAL
Updated on

Rohit Sharma IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दमदार मारा करत भारताची अवस्था बिकट केली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केल्यानंतर पावसाच्या लपंडावात भारताने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र शाहीनने रोहितची विकेट घेत भारताला पहिला धक्का दिला.

रोहित शर्माने पहिल्याच षटकात शाहीन आफ्रिदीला षटकार मारला. त्यानंं पहिल्या षटकात 8 धावा वसूल केल्या अन् पावसाला सुरूवात झाली. रोहितचा हा षटकार ऐतिहासिक ठरला. रोहितचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला 301 वा षटकार ठरला. याचबरोबर शाहीनला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात षटकार मारणारा रोहित शर्मा हा जगातील पहिला फलंदाज ठरला.

Rohit Sharma
IND vs PAK: विराट कोहलीचं पाकिस्तानविरुद्ध असं पहिल्यांदाच झालं; टी20 वर्ल्ड कपमध्ये 12 वर्षांपासून...

रोहितनं शाहीनला पहिल्या षटकात चांगला षटकार मारला होता. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबला. पाऊस थांबल्यावर खेळ पुन्हा सुरू झाला. त्यावेळी मात्र शाहीननं रोहितच्या षटकाराचा बदला घेतला. रोहितने पहिल्या षटकाप्रमाणेच याहीवेळी षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू थेट फिल्डरच्या हातात गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.