IND Vs ENG : टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यानंतर रोहित शर्माचे डोळे पाणवले! मग कोहलीने असं काय केलं की.... VIDEO व्हायरल

Rohit Sharma Emotional VIDEO IND Vs ENG Semifinal : टीम इंडियाने 2022 च्या उपांत्य फेरीतील पराभवाचा बदला 2024च्या टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करून घेतला.
IND vs ENG Rohit Sharma Emotional
IND vs ENG Rohit Sharma Emotionalsakal
Updated on

India vs England T20 World Cup Semifinal : टीम इंडियाने 2022 च्या उपांत्य फेरीतील पराभवाचा बदला 2024च्या टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करून घेतला. या दणदणीत विजयानंतर भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जिथे त्याचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भावूक झाला. तो ड्रेसिंग रूममध्ये रडताना दिसला. रोहितचा तो फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो मान खाली घालून रडत आहे आणि त्याच्या बाजूला विराट कोहली उभा आहे. जे त्याला धीर देत आहे.

IND vs ENG Rohit Sharma Emotional
IND vs ENG T20 WC 24 : बापूने इंग्लंडला आणलं गुडघ्यावर, कुलदीपचाही जलवा; 10 वर्षांनी भारतानं गाठली फायनल

सोशल मीडियावर दोन महान खेळाडूंच्या या फोटोला करोडो चाहते लाइक करत आहेत. मैदानावर आणि मैदानाबाहेर दोघांमध्ये एक वेगळीच बॉण्डिंग पाहायला मिळते. रोहितच्या या फोटोने 2023 च्या वनडे वर्ल्ड कपचीही आठवण करून दिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम पराभवानंतर तो रडताना दिसला होता. मात्र, तेव्हा दु:खाचे अश्रू होते आणि यावेळी विजयाच्या आनंदाचे अश्रू आहे.

IND vs ENG Rohit Sharma Emotional
Paris Olympics 2024 : किरण पहलची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी; 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा

इंग्लंडविरुद्धच्या या शानदार विजयानंतर टीम इंडिया आणि रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रोहितने केवळ कर्णधारपदात चमकदार कामगिरी करून टीम इंडियाला 10 वर्षांनंतर अंतिम फेरीत नेले नाही, तर वैयक्तिक कामगिरीच्या बाबतीतही तो मोठ्या सामन्यांमध्ये उभा राहिला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 92 धावांच्या स्फोटक खेळीनंतर रोहितने इंग्लंडविरुद्धच्या या मोठ्या सामन्यात 57 धावांची मोठी खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाने 171 धावांची मोठी धावसंख्या उभारली. त्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 16.4 षटकांत 103 धावांत ऑलआऊट झाला. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात हिटमॅनची कामगिरी पाहण्यासारखी असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.