T20 World Cup 2021: टीम इंडियाचा टी२० विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध २४ ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कसून तयारी करत आहे. कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मेंटॉर महेंद्रसिंग धोनी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा संघ दमदार कामगिरी करेल याची साऱ्यांनाच खात्री आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू अनेकदा अशा सामन्यांच्या आधी काही मतं व्यक्त करतात. तसंच काहीसं मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केलं.
"पाकिस्तानातील क्रिकेटरसिकांना भारतीय खेळाडू आवडतात. ते भारतीय क्रिकेटर्सची मनसोक्त स्तुती करतात. पाकिस्तानी फॅन्स विराट कोहलीचं कौतुक करत असतात. रोहित शर्माची थोडी जास्त प्रशंसा केली जाते. रोहित पाकिस्तानात विराटपेक्षा थोडासा अधिक लोकप्रिय आहे. पाकिस्तानात रोहित शर्माला भारताचा इंजमाम असं म्हटलं जातं. इंजमामने पाकिस्तानला अनेक सामने जिंकवून दिले तसंच रोहितही प्रतिभावान फलंदाज आहे", अशी माहिती रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरला दिली.
शोएब अख्तरच्या विधानानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने आपलं मत व्यक्त केलं. "वर्ल्ड कपचा इतिहास पाहता भारताने नेहमी पाकिस्तानला पराभूत केले आहे. सामन्याचा निकाल हा ज्या दिवशी सामना खेळला जातो, त्या दिवशीच्या कामगिरीवर अवलंबून असतो. भारतीय संघ नुकताच युएईमध्ये IPL स्पर्धा खेळलेला आहे. त्यामुळे युएईतील परिस्थिती त्यांच्या परिचयाची झाली आहे. खेळाडूदेखील चांगल्या लयीत आहेत. असं असताना पाकिस्तानचा संघ जर जिंकला तर नक्कीच आश्चर्य वाटेल. टी२० क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं हे खरं असलं तरी सध्याच्या घडीला भारताचा संघ हा कागदावर पाकिस्तानपेक्षा वरचढ दिसतोय", असं मत कैफने मांडलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.