Rohit Sharma: अमेरिकेकडून खेळणाऱ्या 'बोरीवली बॉईज'बाबत कर्णधार रोहितचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

Rohit Sharma On the Indian American USA Cricket Athletes: भारत आणि अमेरिका यांच्यात टी-20 वर्ल्ड कप सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने यजमान संघाचा 7 गडी राखून पराभव केला.
Rohit Sharma On Indian American cricketers
Rohit Sharma On Indian American cricketerseSakal
Updated on

Rohit Sharma On Indian American cricketers : भारत आणि अमेरिका यांच्यात टी-20 वर्ल्ड कप सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने यजमान संघाचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यातील विजयासह टीम इंडिया सुपर 8 मध्ये पोहोचली आहे. भारतीय संघ सुपर 8 मध्ये पोहोचल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा खूप आनंदी दिसत होता. दरम्यान अमेरिकेकडून खेळणाऱ्या भारतीय आणि बोरीवली बॉईज'बाबत कर्णधार रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे.

Rohit Sharma On Indian American cricketers
T20 World Cup Super-8 : टी-20 वर्ल्ड कपचा रोमांच शिगेला, 'ग्रुप D'मध्ये मोठी उलथापालत; जाणून घ्या समीकरण... कोण आहे पुढे?

अमेरिकेविरुद्धचा सामना संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, हा सामना जिंकणे कठीण जाईल, हे मला माहीत होते. पण सूर्या आणि दुबे यांनी ज्या प्रकारे संयम राखला, त्यांनी चांगली भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेले.

रोहित शर्माला अमेरिकन क्रिकेट संघात खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंबद्दल विचारण्यात आले खास करून 'बोरीवली बॉईज'बद्दल तेव्हा रोहित शर्मा म्हणाला की, यापैकी बरेच जण आम्ही एकत्र क्रिकेट खेळलो आहे, त्यांची प्रगती पाहून खूप आनंद झाला. त्यांना गेल्या वर्षी एमएलसीमध्ये खेळताना पाहिले आहे, ते सर्व मेहनती खेळाडू आहेत.

Rohit Sharma On Indian American cricketers
T20 World Cup 2024 दरम्यान टीम इंडियाच्या स्टार खेळाडूवर शस्त्रक्रिया, इतके महिने क्रिकेटपासून दूर

सुपर 8 मध्ये पात्र झाल्याबाबत रोहित म्हणाला की, हा मोठा दिलासा आहे, येथे क्रिकेट खेळणे सोपे नव्हते. तिन्ही सामन्यात आम्हाला शेवटपर्यंत टिकून राहावे लागले. या विजयांमुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळेल.

यूएसए कॅम्पमध्ये नितीश कुमार, सौरभ नेत्रावलकर, हरमीत सिंग आणि जसदीप सिंग यांसारख्या खेळाडूंसह अनेक भारतीय चेहरे आहे. नेत्रावलकर अंडर-15 मध्ये सूर्यकुमारसोबत खेळला, तर 2010 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये तो मयंक अग्रवाल, केएल राहुल आणि इतर अनेक स्टार्ससोबत खेळला.

Rohit Sharma On Indian American cricketers
T20 World Cup 2024 दरम्यान टीम इंडियाच्या स्टार खेळाडूवर शस्त्रक्रिया, इतके महिने क्रिकेटपासून दूर

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, अमेरिकेने 20 षटकांत 8 गडी गमावून 110 धावा केल्या. यात नितीशकुमारने सर्वाधिक 27 धावा केल्या. तर स्टीव्हन टेलरने 24 धावांची खेळी केली. तर टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

टीम इंडियाने 111 धावांचे लक्ष्य 18.2 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले. यादरम्यान सूर्यकुमार यादवने मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याने 49 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. त्याचवेळी शिवम दुबेने नाबाद 31 धावा करत सूर्यकुमार यादवला साथ दिली आणि संघाला विजयापर्यंत नेले. तत्पूर्वी, ऋषभ पंत 18 धावा करून बाद झाला. दुसरीकडे या सामन्यात विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही आणि रोहित शर्मालाही 3 धावा करण्यात यश आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.