T2O World Cup 2024 : अमेरिकेत वादळी पावसात अडकले कर्णधार रोहित अन् कोच द्रविड...; 'तो' व्हिडिओ आला समोर

Rohit Sharma & Rahul Dravid : रोहित शर्मा अन् राहुल द्रविड न्यू यॉर्कच्या वादळी पावसात अडकले.
Rohit Sharma
Rohit Sharma New York Rainesakal
Updated on

T2O World Cup 2024 New York Rain : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची न्यूयॉर्कच्या वादळी पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. भारतीय संघ सध्या टी 20 वर्ल्डकप 2024 खेळण्यासाठी युएसएमध्ये दाखल झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये भारतीय संघ 1 जून रोजी आपला एकमेव सराव सामना खेळणार आहे. हा सराव सामना बांगलादेश सोबत होणार आहे. (Rohit Sharma Rahul Dravid Video)

Rohit Sharma
T20 World Cup 2024 IND vs PAK : खरंच भारत-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ला होणार का? ICCने तोडले मौन

भारतीय संघ आधीच न्यूयॉर्कमध्ये दाखल झाला आहे. त्यांनी आपला सराव देखील सुरू आहे. सराव झाल्यानंतर रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी न्यूयॉर्कमध्ये थोडा फेरफटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पावसामुळे त्यांचे सर्व नियोजन कोलमडलं, एका चाहत्यांने पावसामुळे राहुल अन् रोहितची न्यूयॉर्कमध्ये कशी तारांबळ उडाली याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

कर्णधार रोहित शर्मा पावसाचा मारा चुकवण्यासाठी रेस्टराँमधून धावत गाडीकडे जाताना दिसला. त्यानंतर राहुल द्रविड देखील गाडीकडे धावत सुटला.

Rohit Sharma
India Head Coach : गौतम गंभीर नाही तर.... MS धोनी होणार भारताचा मुख्य कोच? कोहलीच्या जवळच्या व्यक्तीने केलं मोठं वक्तव्य

भारतीय संघ टी 20 वर्ल्डकपमधील आपली मोहीम ही 5 जूनला सुरू करणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना हा आयर्लंडविरूद्ध न्यूयॉर्कमध्ये खेळणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ A ग्रुपमध्ये असून या ग्रुपमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसह कॅनडा, आयर्लंड आणि यजमान युएसएचा संघ आहे.

भारतीय संघ 1 जूनला आपला पहिला आणि एकमेव सराव सामना खेळणार आहे. हा सराव सामना बांगलादेशसोबत होणार असून याच सामन्यात रोहित आपलं टीम कॉम्बिनेशन कसं ठेवतो याची झलक दिसेल. सलामीला विराट कोहली येणार की यशस्वी अन् रोहितच सलामी देणार हे देखील याच सामन्यात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

(Cricket Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.