"डोक्याचा वापर करा जरा..." पाकिस्तानी खेळाडूने केलेल्या बॉल टॅम्परिंगच्या आरोपावर कर्णधार रोहित शर्मा संतापला

Rohit Sharma on Inzamam Ul Haq Ball-Tampering Allegations : 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 प्रमाणे, टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिली आहे.
Rohit Sharma on Inzamam Ul Haq Ball-Tampering Allegations
Rohit Sharma on Inzamam Ul Haq Ball-Tampering Allegationssakal

Rohit Sharma on Inzamam Ul Haq Ball-Tampering Allegations : 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 प्रमाणे, टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिली आहे.

दरम्यान पाकिस्तानी टीव्हीवर बसून त्यांच्या माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हकने भारतीय संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला होता. यावर भारतीय कर्णधाराने आपल्या शैलीत इंझमामला प्रत्युत्तर दिले आहे.

Rohit Sharma on Inzamam Ul Haq Ball-Tampering Allegations
Ind vs Eng : पावसावर भारत-इंग्लंड सामन्याचे भवितव्य... मॅच रद्द झाली तर काय होणार?

रोहित शर्माने बुधवारी पत्रकार परिषदेदरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कप सुपर-8 सामन्यात त्याच्या संघाने चेंडूशी छेडछाड केल्याचा पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकचा आरोप फेटाळला आहे.

भारताने सोमवारी ग्रेस आयलेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने या सामन्यात तीन बळी घेतले. इंझमामने एका पाकिस्तानी वाहिनीवरील चर्चेदरम्यान अर्शदीप सिंग आणि भारतीय संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला होता.

इंझमाम म्हणाला होता की, 'अर्शदीप सिंगला डावाच्या 15व्या षटकात स्विंग मिळत होता. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होते. याचा अर्थ 12व्या आणि 13व्या षटकापर्यंत चेंडू स्विंगसाठी तयार होता. भारताने चेंडूशी छेडछाड केली की नाही हे पंचांनी तपासावे.

Rohit Sharma on Inzamam Ul Haq Ball-Tampering Allegations
SA vs AFG : 2 तासात संपला सेमीफायनलचा सामना! अफगाणिस्तानचे स्वप्न भंगले; दक्षिण आफ्रिकेसमोर लज्जास्पद शरणागती

इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याच्या आधी जेव्हा रोहितला इंझमामच्या आरोपाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा त्याने पाकिस्तानच्या माजी फलंदाजाला मन मोकळे ठेवण्याचा सल्ला दिला. रोहित म्हणाला की, “यावर मी तुम्हाला काय उत्तर देऊ? जर तुम्ही दिवसभरात इथल्या परिस्थितीत सामना खेळलात तर खेळपट्टी खूप कोरडी असते त्यामुळे चेंडू आपोआप रिव्हर्स स्विंग होतो. चेंडू फक्त आमचाच नाही तर सर्व संघ खेळत असतानाचही रिव्हर्स होते. कधी कधी डोकं वापरणंही गरजेचं असतं. वर्ल्डकपचे कुठे खेळवले जात आहेत हेही बघावं लागेल. सामने ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये खेळवले जात नाहीयत. मला इतकंच बोलायचं आहे.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com