IND vs ENG: 'विराटने त्याचा फॉर्म फायनलसाठी ठेवलाय...' सतत फ्लॉप ठरणाऱ्या कोहलीबाबत कर्णधार रोहितचे मोठे वक्तव्य

Rohit Sharma on Virat Kohli's form in T20 World Cup 2024: गयाना येथे गुरुवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करून टीम इंडियाने टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम फेरीत धडक मारली.
Rohit Sharma Says Virat Kohli is Saving Form it for the Final T20 World Cup 2024
Rohit Sharma Says Virat Kohli is Saving Form it for the Final T20 World Cup 2024sakal
Updated on

Rohit Sharma on Virat Kohli T20 World Cup 2024 : गयाना येथे गुरुवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करून टीम इंडियाने टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम फेरीत धडक मारली. आता जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. अफगाणिस्तानला हरवून दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीत धडक मारली होती.

भारतीय संघ तिसऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन बनली होती, तर 2014 मध्ये श्रीलंकेकडून विजेतेपदाच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

Rohit Sharma Says Virat Kohli is Saving Form it for the Final T20 World Cup 2024
IND Vs ENG : टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यानंतर रोहित शर्माचे डोळे पाणवले! मग कोहलीने असं काय केलं की.... VIDEO व्हायरल

इंग्लंडविरुद्ध या विजयासह टीम इंडियाने 2022 मध्ये वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत 10 गडी राखून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला. टीम इंडियाच्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने खराब फॉर्ममध्ये असलेल्या आणि सलामीवीर म्हणून सतत अपयशी होत असलेल्या विराट कोहलीबद्दल वक्तव्य केलं.

सामना संपल्यानंतर जेव्हा प्रेजेंटरने विराटच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारला तेव्हा कर्णधार रोहित म्हणाला की, कोहली एक दर्जेदार खेळाडू आहे. कोणताही खेळाडू या टप्प्यातून जाऊ शकतो. अशा मोठ्या सामन्यांमध्ये त्यांचे महत्त्वही आम्हाला कळते. जेव्हा तुम्ही 15 वर्षे क्रिकेट खेळता तेव्हा फॉर्म हा मुद्दा कधीच नसतो. त्यामुळे त्याचा फॉर्म हे चिंतेचे कारण नाही. कदाचित त्याने फायनल सामन्यासाठी आपली सर्वोत्तम खेळी राखून राखून ठेवली असेल. त्यामुळे फायनलसाठी आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा देऊ.

Rohit Sharma Says Virat Kohli is Saving Form it for the Final T20 World Cup 2024
IND Vs ENG : टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यानंतर रोहित शर्माचे डोळे पाणवले! मग कोहलीने असं काय केलं की.... VIDEO व्हायरल

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, रोहितचे अर्धशतक (39 चेंडू, सहा चौकार, दोन षटकार) आणि सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी केलेली 73 धावांची भागीदारी यामुळे भारतीय संघाने सात गडी गमावून 171 धावा केल्या.

त्यानंतर, अक्षर (तीन विकेट) आणि कुलदीप (तीन विकेट) या फिरकीपटूंच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने अवघ्या 16.4 षटकांत 103 धावांत गुंडाळला. जसप्रीत बुमराहने 2.4 षटकात 12 धावा देत 2 बळी घेतले. इंग्लंडकडून फक्त कर्णधार जोस बटलर (23), हॅरी ब्रूक (25), जोफ्रा आर्चर (21) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (11) दुहेरी आकडा गाठू शकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.