T20 WC: पहिल्याच षटकात ट्रंपलमनने घेतल्या ३ विकेट्स (Video)

वेगवान गोलंदाजाने स्कॉटलंडला दिला दणका (Namibia vs Scotland)
Rubel-Trumpelmann-3-wickets
Rubel-Trumpelmann-3-wickets
Updated on
Summary

वेगवान गोलंदाजाने स्कॉटलंडला दिला दणका (Namibia vs Scotland)

Namibia vs Scotland, T20 World Cup 2021: सामन्यात नामिबियाने स्कॉटलंडचा ४ गडी राखून पराभव केला. स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १०९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाच्या संघाने पाच चेंडू आणि चार गडी राखून विजय मिळवला. स्कॉटलंडकडून मायकल लीस्क याने २७ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. तर नामिबियाकडून प्रत्युत्तरात जे जे स्मिट याने नाबाद ३२ धावा करत संघाला विजयी केले. या सामन्यातील पहिलं षटक प्रचंड गाजलं.

Rubel-Trumpelmann-3-wickets
T20 WC: भन्नाट कॅच!! डेवॉन कॉनवेने थेट हवेत घेतली झेप अन्...

नामिबियाकडून रूबेन ट्रंपलमन या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने पहिलं षटक टाकलं. महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्या षटकात त्याने तीन गडी बाद केले. पहिल्या चेंडूवर त्याने जॉर्ज मुन्सीला, तिसऱ्या चेंडूवर त्याने कॅलम मॅकलोडला तर चौथ्या चेंडूवर त्याने रिची बेरिंग्टनला माघारी धाडले. या षटकात त्याने कोणत्याही खेळाडूला बॅटने धाव करून दिली नाही. त्याच्या या स्वप्नवत षटकामुळे नामिबियाला संघाच्या सामन्याच्या सुरुवातीलाच आघाडी मिळाली. त्याचा योग्य वापर करत त्यांनी सामना जिंकला.

पाहा ट्रंपलमनचे 'ते' पहिलं षटक-

Rubel-Trumpelmann-3-wickets
T20 WC: "निर्लज्ज माणूस"; वकारवर व्यंकटेश प्रसाद संतापला

दरम्यान, मायकल लीस्कच्या ४४, ख्रिस ग्रीव्हच्या २५ आणि मॅथ्यू क्रॉसच्या १९ धावांच्या बळावर स्कॉटलंडने २० षटकांमध्ये ८ बाद १०९ धावांपर्यंत मजल मारली. ट्रंपलमनने ३, जॅन फ्रायलिंकने २ तर जेजे स्मिटने २ बळी टिपला. या आव्हानाचा पाठलाग करताना जेजे स्मिटच्या नाबाद ३२, क्रेग विल्यम्सच्या २३ आणि मायकल वॅन लिंगनच्या १८ धावांच्या बळावर नामिबियाने आव्हान पार केले. स्कॉटलंडकडून लीस्कने २, ब्रॅड व्हील आणि सफ्यान शरिफने १-१ गडी बाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.