SA vs AFG Score T20 WC24 : दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास! पहिल्यांदाच वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत मारली धडक

T20 World Cup 2024 Semi Final South Africa vs Afghanistan Latest Scorecard Update : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रिनिदादच्या तारुबा येथील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला जात आहे.
T20 World Cup 2024 Semi Final South Africa vs Afghanistan
T20 World Cup 2024 Semi Final South Africa vs Afghanistansakal

South Africa vs Afghanistan T20 World Cup 2024 Semi Final : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रिनिदादच्या तारुबा येथील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेला आहे. या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे आणि पहिल्यांदाच वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली.

टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अफगाणिस्तानची अवस्था बिकट झाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी 11.5 षटकात 56 धावांत सर्वबाद झाला.

आफ्रिकेकडून मार्को जॅनसेन आणि तबरेझ शम्सी यांनी सर्वाधिक 3-3 बळी घेतले. अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला उमरझाईने सर्वाधिक 10 धावा केल्या. उमरझाई हा संघासाठी दुहेरी आकडा पार करणारा एकमेव फलंदाज होता.

दक्षिण आफ्रिकेने या छोट्या लक्ष्याचा सहज पाठलाग केला. संघाने 8.5 षटकांत 1 गडी गमावून 60 धावा केल्या. अफगाणिस्तानचा गोलंदाज फजलहक फारुकीने क्विंटन डी कॉकची विकेट लवकर घेतली असली तरी कर्णधार एडन मॉर्कम आणि रीझा हेंड्रिक्स यांनी 43 चेंडूत 55 धावांची खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.

SA vs AFG Live Score T20 WC24 : दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास! पहिल्यांदाच वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत मारली धडक

उपांत्य फेरीत नऊ गडी राखून विजय मिळवून दक्षिण आफ्रिका 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.

SA vs AFG Live Score T20 WC24 : क्विंटन डी कॉक क्लीन बोल्ड! 5 वर आफ्रिकेला बसला पहिला धक्का

दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का क्विंटन डी कॉकच्या रूपाने पाच धावांच्या स्कोअरवर बसला. त्याला फजलहक फारुकीने बोल्ड केले. कर्णधार एडन मार्कराम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

SA vs AFG Live Score T20 WC24 : दक्षिण आफ्रिकेचा डाव सुरू, क्विंटन डी कॉक अन् रीझा हेंड्रिक्स क्रीजवर

दक्षिण आफ्रिका 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहे. क्विंटन डी कॉक आणि रीझा हेंड्रिक्स सलामीला आले आहेत. नवीन-उल-हक डावातील पहिले षटक टाकत आहे.

SA vs AFG Live Score T20 WC24 : एक तासात अफगाणिस्तानचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेला केवळ 57 धावांचे लक्ष्य

उपांत्य फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या महत्त्वाच्या सामन्यात त्याचा हा निर्णय चुकला. संपूर्ण संघ केवळ 56 धावांत ऑलआऊट झाला.

SA vs AFG Live Score T20 WC24 : तो आला..त्याने पाहिले अन्... 50 च्या स्कोअरवर अफगाणिस्तानला 8वा धक्का! दक्षिण आफ्रिकेचा डंका

दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध अफगाणिस्तान संघाने 50 धावांवर नूर अहमदच्या रूपाने आपली 8वी विकेट गमावली आहे. तबरेझ शम्सीने खाते न उघडता नूरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

SA vs AFG Live Score Semi Final T20 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानची केली बोलती बंद! अर्ध्याहून जास्त संघ पॅव्हेलियनमध्ये

एनरिक नॉर्टजेने अफगाणिस्तानला सहावा धक्का दिला. त्याने अजमतुल्ला उमरझाईला स्टब्सकरवी झेलबाद केले. त्याला केवळ 10 धावा करता आल्या. राशिद खान आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. सात षटकांनंतर संघाची धावसंख्या 29/6 आहे.

SA vs AFG Live Score Semi Final T20 World Cup 2024 : पॉवर-प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा डंका! 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तान संघाला पहिल्या 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर 5 गडी गमावून केवळ 28 धावा करता आल्या.

SA vs AFG Live Score Semi Final T20 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा कहर! 5 षटकांत अफगाणिस्तानचा निम्मा संघ तंबूत

सेमीफायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांचा कहर पाहिला मिळत आहे. 5 षटकांत अफगाणिस्तानचा निम्मा संघ तंबूत गेला आहे. 23 धावांवर संघाला पाचवा धक्का बसला. मार्को जॅनसेनने खरोटेला बाद केले. त्याला केवळ दोन धावा करता आल्या.

SA vs AFG Live Score Semi Final T20 World Cup 2024 : सेमीफायनल मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा तांडव! अफगाणिस्तानला 3 ओव्हरमध्ये दिले 4 धक्के

चौथे षटक टाकायला आलेल्या कागिसो रबाडाने दोन विकेट घेतले. त्याने पहिल्याच चेंडूवर इब्राहिम झद्रानला बोल्ड केले. यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने मोहम्मद नबीला बोल्ड केले. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. चार षटकांनंतर संघाची धावसंख्या 20/4 आहे.

SA vs AFG Live Score Semi Final T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानला 16 धावांवर दुसरा मोठा धक्का! गुलबदीन फक्त ९ धावा करून आऊट

मार्को यानसेननेही अफगाणिस्तानला दुसरा धक्का दिला. त्याने 16 धावांवर गुलबदीन नायबला बाद केले. त्याला केवळ नऊ धावा करता आल्या.

SA vs AFG Live Score Semi Final T20 World Cup 2024 : दोन्ही संघांची प्लेइंग-11

अफगाणिस्तानचे प्लेइंग इलेव्हन : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जद्रान, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नांगेलिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.

दक्षिण आफ्रिकेचा प्लेइंग इलेव्हन : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जेन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नोरखिया ​​आणि तबरेझ शम्सी.

SA vs AFG Live Score Semi Final T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानने जिंकली नाणेफेक! घेतला हा निर्णय

अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तो म्हणाला, 'आम्ही प्रथम फलंदाजी करू. ही एक नवीन विकेट आहे. आम्हाला येथे स्कोअरबोर्डवर मोठे लक्ष्य ठेवायचे आहे. जेव्हा तुमच्या फ्लाइटला चार तास उशीर होतो तेव्हा गोष्टी सोप्या नसतात पण तरीही तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com