Saurabh Netravalkar T20 World Cup 2024 : युएसए आणि वेस्ट इंडीज येथे सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये यजमान युएसए संघाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. युएसएने पाकिस्तानचा पराभव करत यंदाच्या वर्ल्डकपमधील सर्वात मोठा अपसेट केला. या विजयात मराठमोळा सौरभ नेत्रावळकरने मोलाचा वाटा उचलला. त्याने सामन्यावेळी 2 विकेट्स घेतल्याच. त्याचबरोबर त्यानं सुपर ओव्हरमध्ये 18 धावा देखील डिफेंड केल्या होत्या.
सौरभ नेत्रावळकरने भारताविरूद्धच्या सामन्यात देखील दमदार मारा करत रोहित शर्मा आणि विराट कोहली यासारख्या दिग्गजांची विकेट घेतली. सौरभ हा अमेरिकेच्या संघात असला तरी तो काही पेशाने क्रिकेटपटू नाही. तो उदरनिर्वाहासाठी नोकरी करतो. तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तो Oracle Financial Services Software या कंपनीत काम करतो. या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून 6 टक्क्यांची वाढ झाली आहे.
सौरभ नेत्रावळकरने टी 20 वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो ओरॅकल कंपनीत प्रिंसिपल मेंबर ऑफ टेक्निकल स्टाफ पदावर कार्यरत आहे.
ओरॅकल कॉर्पची एक उपकंपनी भारतमध्ये देखील लिस्टेड आहे. Oracle Financial Services Software ओरॅकल कॉर्पचे अमेरिकेतील शेअर आणि ओरॅकल फायनेशियलचे भारतातील शेअर वाढले आहेत.
न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये बुधवारी ओरॅकल कॉर्पचे शेअर्स 13.32 टक्क्यांनी वाढला. हा शेअर 140.38 डॉलरवर बंद झाला. ओरॅकल कॉर्पोरेशन ही एक अमेरिकेची मल्टीनॅशनल कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी कंपनी आहे. त्याचे हेड ऑफिस हे ऑस्टिन, टेक्सास येथे आहे.
ओरॅकल फायनेशियलचे शेअर गुरूवारी बीएसई मध्ये 8741.80 रूपयाला होता. बाजार उघडल्यावर तो 8849.40 रपयांवर पोहचला होता. त्यानंतर तो 6.44 टक्के वाढून 9304.85 रूपयांपर्यंत पोहचला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.