USA vs RSA : नेत्रावळकरचा प्रभावी मारा, हरमीतही चमकला; मात्र युएसएची झुंज मोडून काढत दक्षिण आफ्रिका जिंकली

T20 World Cup 2024 Super 8 : सुपर 8 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला. मात्र युएसएने देखील चांगली टक्कर दिली.
USA vs RSA
T20 World Cup 2024 USA vs RSA ESAKAL
Updated on

T20 World Cup 2024 USA vs RSA : टी 20 वर्ल्डकप 2024 च्या सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने युएसएचा 18 धावांनी पराभव केला. प्रथम फंलदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने 195 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात युएसएने झुंजार खेळ करत 20 षटकात 176 धावांपर्यंत मजल मारली. युएसएकडून अॅड्रियास गोऊसने सर्वाधिक 80 धावा केल्या. आफ्रिकेकडून रबाडाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

युएसएकडून सौरभ नेत्रावळकरने प्रभावी मारा करत 4 षटकात 21 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याने रिझा हेंड्रिक्स आणि एडिन मारक्रमची विकेट मिळवली. तर दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर क्विंटन डिकॉकने दमदार खेळी करत 40 चेंडूत 74 धावा केल्या. मारक्रमने 46 तर क्लासेनने 36 धावांचे योगदान दिलं. यामुळे दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 195 धावांपर्यंत मजल मारली.

USA vs RSA
Marcus Stoinis : मार्कस स्टॉयनिसने मोहम्मद नबीचं अव्वल स्थान हिसकावलं; टी 20 अष्टपैलू रँकिंगमध्ये झाले मोठे बदल

नाणेफेक जिंकून युएसएने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पॉवर प्लेच्या सुरूवातीच्या षटकात युएसएने चांगला मारा करत आफ्रिकेला रोखून धरलं होतं. सौरभ नेत्रावळकरने हेंड्रिक्सला बाद करत पहिला धक्काही दिला होता. मात्र कर्णधार मारक्रम आणि क्विंटन डिकॉकने दुसऱ्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी रचली.

अखेर ही जोडी नेत्रावळकरनेच फोडली. त्यानं मारक्रमला 46 धावांवर बाद केलं. डिकॉक देखील 40 चेंडूत 74 धावा करून बाद झाला. त्याला हरमीत सिंगनं बाद केलं. हरमीतनं पाठोपाठ डेव्हिड मिलरला शुन्यावर बाद करत मोठा धक्का दिला होता.

मात्र यानंतर क्लासेन आणि ट्रिस्टन स्टब्सने डाव सावरत संघाला 195 धावांपर्यंत पोहचवलं. क्लासेनने 36 तर स्टब्सने नाबाद 20 धावा केल्या.

USA vs RSA
Gautam Gambhir: गौतम गंभीर कोच झाल्यावर बदलणार टीम इंडियाचे चित्र; रोहित-विराटचं भविष्य काय?

दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी 196 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर युएसएने पॉवर प्लेमध्ये दमदार सुरूवात केली. त्यांनी 5 षटकात 1 बाद 52 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर रबाडाने एका पाठोपाठ एक विकेट्स घेत युएसएची अवस्था 5 बाद 76 धावा अशी केली.

युएसएचा सलामीवीर अँड्रियेस गोऊस एका बाजूनं झुंज देत होता. अखेर त्याला हरमीत सिंगची साथ लाभली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी रचली. अँड्रियेसन 46 चेंडूत नाबाद 80 धावांची खेळी केली. तर हरमीतने 22 चेंडूत 38 धावा चोपल्या. अखेर हरमीतला रबाडानेच बाद करत युएसएला पराभवाच्या खायीत लोटलं. शेवटच्या षटकात विजयासाठी 27 धावांची गरज असताना नॉर्खियाने फक्त 7 धावा दिल्या.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.