Saurabh Netravalkar : विराट, रोहितची विकेट घेतली तरी सुट्टी नाही! सौरभ नेत्रावळकरचं ‘वर्क फ्रॉम हॉटेल’

T20 World Cup 2024 : सौरभ टी 20 वर्ल्डकपमध्ये युएसएचे प्रतिनिधित्व करतोय... तेही त्याचं काम सांभाळून
Saurabh Netravalkar
Saurabh Netravalkar USA vs IREesakal
Updated on

Saurabh Netravalkar USA vs IRE : आधी नोकरी, मग खेळ असे समीकरण असलेल्या अमेरिका क्रिकेट संघातील खेळाडूंना या दोहोंमधील समन्वय साधावा लागत आहे. सध्या चर्चेत असलेला मराठमोळा सौरभ नेत्रावळकर याला तर सकाळी सामने आणि आणि नंतर ऑफिसचे काम म्हणजेच ‘वर्क फ्रॉम हॉटेल’ अशी कसरत करावी लागत आहे.

Saurabh Netravalkar
USA vs IRE : युएसए - आयर्लंड सामन्याच्या नाणेफेकीला उशीर; पाकिस्तानच्या घशाला पडली कोरड

अमेरिकेतील ‘ऑरेकल’ या प्रसिद्ध कंपनीत नोकरी करत आहे. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा ही त्याच्यासाठी हौशेचा भाग आहे. अगोदर पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केल्यानंतर भारताविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना बाद करून सौरभ लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला.

आपल्या अमेरिका संघाची मजल साखळी सामन्यांपर्यंतच असेल. असे त्याच्यासह सर्वांनाच वाटत होते म्हणून सौरभने आपल्या कंपनीतून १५ जूनपर्यंतचीच सुट्टी घेतली, मात्र त्याचा संघ सुपर- आठ फेरीसाठी पात्र ठरत असल्यामुळे त्याला सुट्टी वाढवावी लागणार आहे.

Saurabh Netravalkar
IND vs CAN Playing 11 : रोहित विराटबाबत घेणार मोठा निर्णय? 3 सामन्यात फेल गेल्यानंतर...

सुट्टीवर असला तरी त्याची कामापासून सुटका झालेली नाही. कंपनीचा लॅपटॉप तो सोबत बाळगत आहे. सामना संपल्यानंतर हॉटेलमध्ये परतल्यावर सौरभ ऑफिसचे काम करतो, अशी माहिती त्याच्या बहिणीने दिली आहे.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.